सेनापतींचा ’उत्तम’ कारभार; मात्र सैन्याचा नाही हातभार; लाचलुचपत विभागाची औंध पोलीस ठाण्यातील कारवाईची हॅट्रिक; माझा पती उचापती…….का पतीच्या मागे मी?

Homeमहाराष्ट्रसातारा

सेनापतींचा ’उत्तम’ कारभार; मात्र सैन्याचा नाही हातभार; लाचलुचपत विभागाची औंध पोलीस ठाण्यातील कारवाईची हॅट्रिक; माझा पती उचापती…….का पतीच्या मागे मी?

औंध पोलीस ठाण्यात सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत एका पोलिस कॉन्स्टेबलसह महिला पोलीस उपनिरीक्षकाच्या पतीवर कारवाई केली.

15 लाखांसाठी अपहरण करणार्‍या टोळीचा पर्दाफाश
शाळा सुरु करण्याचा निर्णय 15 डिसेंबरला घेणार ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती
जयंत पाटील यांना ईडीची नोटीस


औंध / वार्ताहर : औंध पोलीस ठाण्यात सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत एका पोलिस कॉन्स्टेबलसह महिला पोलीस उपनिरीक्षकाच्या पतीवर कारवाई केली. यामुळे औंध पोलीस ठाण्याची प्रतिमेला धक्का बसला. पोलीस ठाण्याच्या सेनापतीला अंधारात ठेवून परस्पर कार्यक्रम करणार्‍या सैन्याला येथून पुढे तरी चाप बसणार का असा प्रश्‍न निर्माण झाला आहे तर महिला उपनिरीक्षकाच्या पतीने केलेल्या उचापतीमागे कोणाचा हात आहे. त्यांच्या परवानगीशिवाय हे शक्य आहे का? असा प्रश्‍न औंधकरांच्या मनात घोळत आहे.

औंध पोलीस ठाण्यातील 2011 पासून ते आजपर्यंत ही तिसरी घटना आहे. मागील दोन घटना आपल्याच पोलीस ठाण्यात घडल्या असून आपण सर्वसामान्य जनतेला कसा न्याय द्यावा हे कर्मचार्‍यांना अद्याप समजले नसल्याचे कालच्या घटनेने उघड झाला आहे. पोक्सोप्रकरणातील तक्रारदारांना बिनधास्तपणे तुम्हाला गुन्ह्यात मदत करतो एवढीच रक्कम पाहिजे. असे म्हणणार्‍या दप्तरी कारकुनाला एवढी ताकद येतेच कुठून असा प्रश्‍न विचारला जाऊ लागला आहे. त्यातच तक्रारदारांना प्रचंड मानसिक त्रास देऊन त्यांना लाचलुचपत विभागाचे दरवाजे ठोठावण्यास भाग पाडले.

औंध पोलीस ठाण्यातील दप्तरी कारकून असणार्‍या शिंदे याला पुसेसावळी दूरक्षेत्रातील गावांतील गुन्हे उघड करण्यासाठी खूपच रस असल्याचे दिसून आले. मागील काही महिन्यातच औंध पोलीस ठाण्याची तपासणी झाली. यासाठी सपोनि यांनी मेहनत घेऊन पोलीस ठाण्याचा चेहरामोहरा बदलला. मात्र, आत दप्तरी असणार्‍या मोहर्‍याचा अंदाज त्यांना लावता आला नाही. त्यामुळे सेनापतींचा जरी ’उत्तम’ कारभार असला तरी सैन्याचा हातभार नसल्याने ही वेळ येऊन ठेपली असल्याचे बोलले जात आहे.

चंद्रकांतला …’स्नेह’ नडल्याची चर्चा 

औंध पोलीस ठाण्यातील दप्तरी कारकून चंद्रकांत शिंदे याचा पोलीस ठाणे व परिसरातील लोकांशी असणारा वाढत असणार्‍या ’स्नेहा’ पुढे त्याला काही दिसत नव्हते. त्यामुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक पदाची स्वप्ने बघणारा शिंदे याला ’स्नेह’ नडल्याची चर्चा औंधसह तालुक्यात सुरु आहे.

हैद्राबादला फौजदारी रुबाब

या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी तपासी अधिकार्‍याबरोबर हा कारकून रीतसर सुट्टी टाकून हैदराबादला जाऊन तिथे तक्रारदाराच्या नातेवाईकला मारहाण करून, तिथे आराम करून जीवाची मुंबई करून आला असल्याचे तक्रारदारांनी खाजगीत बोलताना सांगितले. त्यामुळे हैदराबाद येथेही आपला रुबाब दाखविला असल्याची चर्चा आहे.

गव्हाबरोबर किडे…

औंध पोलीस ठाण्यातील काही कर्मचारी अत्यंत प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावत आहेत. मात्र, कालच्या घटनेने त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सर्वसामान्य लोकांचा बदलू शकतो. त्यामुळे शिंदे आणि उचा… पती यामुळे गव्हाबरोबर किडे रगडू शकतात.

ट्रॅपची हॅट्रिक

औंध पोलीस ठाण्यातील या ट्रॅपसह हट्रिक झाली असून यापूर्वी सन 2011 मध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक, सन 2018 मध्ये पोलीस उपनिरीक्षक आणि आता सन 2021 मध्ये पोलीस कॉन्स्टेबल व महिला पोलिस उपनिरीक्षकाचा पती अशी हॅट्रिक झाली. त्यामुळे कर्मचारी आता किती बोध घेणार हे येणारा काळच ठरविणार आहे.

COMMENTS