संगमनेर/प्रतिनिधी ः डंपर चालक डंपर रिव्हर्स घेत असताना डंपरच्या चाकाखाली सापडून चार वर्षे वयाच्या चिमूर्डीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवार

संगमनेर/प्रतिनिधी ः डंपर चालक डंपर रिव्हर्स घेत असताना डंपरच्या चाकाखाली सापडून चार वर्षे वयाच्या चिमूर्डीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी संध्याकाळी संगमनेर तालुक्यात घडली. या प्रकाराने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. संगमनेर तालुक्यातील मेंढवन येथे ही दुर्दैवी घटना घडली असून माही आजीज पठाण (वय चार वर्षे) असे या दुर्दैवी बालिकेचे नाव आहे. या संदर्भात संगमनेर तालुका पोलीस ठाण्यामध्ये डंपर चालक राजेंद्र भागवत बडे याच्या विरोधात विविध कलमांतर्गत या बालिकेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
डंपर चालक राजेंद्र बडे हा सोमवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास माळवाडी वस्ती मेंढवन येथे त्याच्या ताब्यातील डंपर हयगयीने व अविचाराने डंपर मालकाच्या घरासमोर रिव्हर्स (मागे) घेत होता. या दरम्यान तेथे जवळच चार वर्षे वयाची ही बालिका खेळत होती. डंपर चालकाच्या ही बाब लक्षात आली नाही. खेळत असलेली बालिका डंपर खाली सापडून मृत्युमुखी पडली. या संदर्भात संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात रमजान अहमद पठाण (वय 60 वर्ष, रा. मेंढवन ता. संगमनेर) यांच्या तक्रारीवरून डंपर चालक आरोपी राजेंद्र बडे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय खंडिझोड पुढील तपास करत आहेत.
COMMENTS