Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दुचाकी व दूध टँकरच्या अपघातात तरुणाचा मृत्यू

संगमनेर/प्रतिनिधी ः लोणी-नांदूर शिंगोटे रस्त्यावर तळेगाव नजीक दुधाचा टँकर आणि दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रव

मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ मोटर सायकल रॅलीचे आयोजन
वृक्ष वेद फाउंडेशन व वृक्षमित्र संघटनेच्या वतीने वृक्षारोपण
मोटार वाहन निरीक्षक आयेशा हुसैनवर अफरातफरीचा गुन्हा

संगमनेर/प्रतिनिधी ः लोणी-नांदूर शिंगोटे रस्त्यावर तळेगाव नजीक दुधाचा टँकर आणि दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रवींद्र बाळासाहेब पवार (वय 32 वर्ष, रा. तळेगाव दिघे, संगमनेर) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
अधिक माहिती अशी, रवींद्र बाळासाहेब पवार हा सोमवारी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास पिंपळे येथील रवी चकोर यांच्या खडी क्रेशर वरील काम आटोपून घरी तळेगाव दिघेकडे मोटार सायकलवरून नांदूर शिंगोटे – लोणी रस्त्याने परतत असताना समोरून भरधाव वेगाने नाशिकच्या दिशेने प्रभात डेअरीचा दूध टँकर येत होता. लोणी-नांदूर शिंगोटे मार्गावर हॉटेल कमलेश समोर दूध टँकरने पवार यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. अपघातानंतर जखमी पवार याला रुग्णालयात न हलविता दूध टँकर चालक पळून गेला. अपघातामध्ये रवींद्र पवार याचा मृत्यू झाला. या संदर्भात संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात मृत रवींद्र पवार यांचा भाऊ किरण बाबासाहेब पवार याने गेलेल्या फिर्यादीवरून प्रभात डेअरीच्या दूध टँकरवरील (एम.एच. 17 बीडी 4504) चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित ठाकरे पुढील तपास करीत आहेत.

COMMENTS