Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नौदलाच्या जहाजावर आग

मुंबई ः नेव्हल डॉकयार्ड, मुंबई येथे दुरुस्ती आणि देखभाल  सुरु असलेल्या भारतीय नौदलाच्या जहाजावर 21 जुलै 2024 रोजी संध्याकाळी आग लागली.जहाजावर निय

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केले पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना अभिवादन
पोलिस प्रशासनाचा स्तुत्य उपक्रम; परंतु…
एकता फौंडेशनच्यावतीने शुक्रवारी ‘जॉब फेअर’चे आयोजन

मुंबई ः नेव्हल डॉकयार्ड, मुंबई येथे दुरुस्ती आणि देखभाल  सुरु असलेल्या भारतीय नौदलाच्या जहाजावर 21 जुलै 2024 रोजी संध्याकाळी आग लागली.जहाजावर नियमित देखभालीचे काम करत असताना जहाजावरील कर्मचार्‍यांना आग लागल्याचे लक्षात आले. जहाजाच्या अग्निशमन दलाने तात्काळ आग विझवण्यास सुरुवात केली. नौदल डॉकयार्ड, मुंबई आणि आसपासच्या इतर युनिट्सच्या अग्निशमन दलाने आग शमवण्यात मदत केली. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले असून या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. नौदल अधिकार्‍यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश  दिले  आहेत.

COMMENTS