Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वानटाकळी, वाघाळा येथे कापूस पिकाची शेतीशाळा संपन्न

गुलाबी बोंडअळी व्यवस्थापनासाठी कामगंध सापळे लावा-शिवप्रसाद येळकर

परळी प्रतिनिधी - सध्या कृषी क्षेत्राला विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी शेतकर्‍यांनी एकात्मिक पीक पद्धतीचा अवलं

स्वाभिमान पक्षाचा राजीनामा देताना नवनीत राणा भावुक
आईने केला पोटच्या पोराचा सौदा | LOKNews24
शांततापूर्ण सहअस्तित्वानेच जगाची भरभराट !

परळी प्रतिनिधी – सध्या कृषी क्षेत्राला विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी शेतकर्‍यांनी एकात्मिक पीक पद्धतीचा अवलंब करावा, असे आवाहन उपविभागीय तंत्रज्ञान समन्वयक शिवप्रसाद येळकर यांनी कृषी विभागामार्फत आयोजीत राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकास योजने अंतर्गत प्रशिक्षण कार्यक्रमात केले. सदर शेतीशाळेमध्ये येळकर यांनी शेतकर्‍यांना रासायनिक कीटकनाशकांचा व खतांचा बेसुमार वापर केल्यामुळे उत्पादन खर्चा मध्ये होत असलेली वाढ आणि कृषी परिसंस्थेचा होत असलेला र्‍हास विस्तृतपणे समजावून सांगितला. उत्पादन खर्च कमी करून कीड रोग अन्नद्रव्य व्यवस्थापन करण्यासाठी एकात्मिक पद्धतीचा वापर करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. घरच्या घरी चिकट सापळे तयार करून शेतामध्ये लावल्यास त्यापासून रस शोषक किडींचा बंदोबस्त करता येईल याची माहिती दिली. एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी व जमिनीचा पोत सुधारण्यासाठी वसंतराव नाईक कृषि विद्यापीठाच्या बायोमिक्सचा वापर करून जिवाणू स्लरी तयार करून पिकांना देण्यासंदर्भात माहिती दिली. सद्यस्थितीत पडलेल्या पावसाच्या खंडामध्ये पिकाचे पाणी आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन करण्यासाठी पिकाला संरक्षित पाणी द्यावे तसेच जैविक अजैविक ताण पडू नये यासाठी 13: 00: 45 या विद्राव्य खताची 8 ग्रॅम प्रति 1 पाण्यातून फवारणी करावी याची माहिती दिली. फवारणी करताना घ्यावयाची काळजी संदर्भात विस्तृतपणे माहिती देऊन सुरक्षित किटचा वापर करून फवारणी करण्याचे प्रात्यक्षिक दाखवले. मंडळ कृषी अधिकारी शिवानंद चाळक यांनी कापूस पिकाच्या मूल्य साखळीची माहिती देऊन शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून प्रक्रिया उद्योग उभारणी संदर्भात मार्गदर्शन केले. कृषी सहायक रवि शिरसाट यांनी गुलाबी बोंडअळी व्यवस्थापनासाठी कामगंध सापळे लावण्याचे प्रशिक्षण करून दाखवले. कृषी सहाय्यक महेश क्षिरसागर यांनी किसान सन्मान निधी केवायसी बाबत माहिती दिली. सदर शेतीशाळेला कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS