रायगड प्रतिनिधी- रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील दासगाव मोहल्लामध्ये नारळाच्या झाडावर वीज कोसळल्याने नारळाच्या झाडाला आग लागली. झाडाला आग लाग

रायगड प्रतिनिधी– रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील दासगाव मोहल्लामध्ये नारळाच्या झाडावर वीज कोसळल्याने नारळाच्या झाडाला आग लागली. झाडाला आग लागली असली तरी यावेळी कोणतीही जीवितहानी झाली नाही. दासगाव मोहल्ला येथे काल विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळत होता, त्यावेळी अचानक नारळाच्या झाडावर वीज कोसळल्याने झाडाने पेट घेतला. यावेळी झाडाला आग लागताच ही घटना अनेकांनी कॅमेऱ्यामध्ये कैद केली. या घटनेत झाडाचे नुकसान झाले असून झाडाच्या वरच्या भाग जळून खाक झाला आहे
COMMENTS