नगर अर्बनचे संचालक कोठारींसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल ; बायोडिझेलचा बेकायदेशीर वापर केल्याची तक्रार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नगर अर्बनचे संचालक कोठारींसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल ; बायोडिझेलचा बेकायदेशीर वापर केल्याची तक्रार

अहमदनगर/प्रतिनिधी : डांबर व खडी मिक्सिंग प्लान्टवरील वाहतुकीच्या वाहनांना इंधन म्हणून बायोडिझेलचा वापर केला व त्याचा साठा केल्याबद्दल येथील नगर अर्बन

केडगावात एकाच दिवशी दोनजण झाले बेपत्ता
जिल्ह्यातील पाच पाणी योजनांसाठीसाडे अठरा कोटीचा निधी मंजूर
संचारबंदी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुख उतरले रस्त्यावर

अहमदनगर/प्रतिनिधी : डांबर व खडी मिक्सिंग प्लान्टवरील वाहतुकीच्या वाहनांना इंधन म्हणून बायोडिझेलचा वापर केला व त्याचा साठा केल्याबद्दल येथील नगर अर्बन बँकेचे संचालक अनिल कोठारींसह तिघांविरुद्ध कर्जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्जत तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक श्रीरंग अनारसे यांनी याप्रकरणी पोलिसात तक्रार दिली आहे.
कर्जत तालुक्यातील आळसुंदे गावाचे शिवारातील गट नं.622 मधील डांबर मिक्सिंग खडी प्लान्टमध्ये टँकरमध्ये (क्र. जीजे 15 वायवाय 8275) राजधारी रामकिशोर यादव (वय 55 वर्षे, रा. सवरिहा तहसील मछलीशहर,जिला जौनपुर, उ.प्र.), श्रीकांत दत्तात्रय खोरे (रा.मुळेवाडी, ता.कर्जत, जि.अहमदनगर) व अनिल चंदुलाल कोठारी (रा.आनंद अपार्टमेंट, सहकार सभागृह रोड,अहमदनगर) यांनी संगनमत करुन बेकायदेशीररित्या डांबर-खडी मिक्सिंग प्लान्टचे वाहतुकीकरिता असणारे जुने हायवा, जुने जेसीबी, पोकलंड व इतर वाहने यांना लागणारे अधिकृत इंधनाऐवजी ज्वलनशील पदार्थांचे इंधन हे बेकायदेशिररित्या
प्राप्त करुन त्याचा वापर करण्याकरिता टँकरमध्ये (क्र. जीजे 15 वायवाय 8275) बाळगताना व या टँकरमधून ते ज्वलनशील इंधन हे काढण्याकरिता इलेक्ट्रिक मोटार, पाईप व साठवणुकीकरिता त्या ठिकाणी नादुरुस्त असलेला टँकरचा (क्रमांक एमएम 04 इबी 0157) वापर करत असल्याने त्यांच्याविरुध्द पेट्रोलियम अधिनियम सन 1934चे कलम 23(ए), अत्यावश्यक वस्तु अधिनियम सन 1955 चे कलम 3, 7, मोटार स्पिरीट आणि हायस्पीड डिझेल ऑर्डर, 1998चे (पुरवठा नियमन व वितरण व गैरव्यवहार प्रतिबंध) कलम 3,4,6 व भादंवि कलम 285,34 प्रमाणे सरकारतर्फे फिर्याद दिली आहे.

63 लाखाचा मुद्देमाल जप्त
कर्जत तालुक्यातील आळसुंदे येथील बनावट बायोडिझेल प्रकरणात महसूल विभाग आणि पोलिसांनी कारवाई करीत बायोडिझेलसह वाहने व साहित्य असा 63 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत तीन जणांविरोधात कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार कोठारी यांच्या डांबर मिक्सिंग प्लान्टच्या गाड्यांमध्ये बायोडिझेलसदृश हा पेट्रोलियम पदार्थ इंधन म्हणून वापरला जात होता. या टँकर सोबत असलेल्या पावतीवर सिलवासा ते अहमदनगर असा पत्ता होता. मात्र ते नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात असणार्‍या डांबर मिक्सिंग प्लान्टवर उतरले जात होते. हा ज्वलनशील पदार्थ डंपर आणि इतर वाहनांना इंधन म्हणून वापरला जात असल्याचे समोर आले आहे.

वापराचा परवाना नाही
डांबर-खडी मिक्सर प्लान्टला वाहतूक करणार्‍या वाहनांना इंधन म्हणून या बायोडिझेलचा वापर होत असल्याचे स्पष्ट झाल्यावर तपासी अधिकार्‍यांनी प्लान्ट मॅनेजर खोरे यांच्याकडे या ज्वलनशील पदार्थाचा इंधन म्हणून वापर करण्यासाठी परवाना आहे की नाही, याची विचारणा केल्यावर त्यांनी असा कोणताही परवाना नसल्याचे सांगितले व इंधन वापराचा कोणताही परवाना सादरही केला नाही. दरम्यान, तहसीलदार नानासाहेब आगळे व पुरवठा निरीक्षक अनारसे यांनी संबंधित टँकरमधील ज्वलनशील पदार्थाचे (बायोडिझेल) सॅम्पल तपासणीसाठी भारत पेट्रोलियम कंपनीला दिले आहे.

COMMENTS