Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोपरगावच्या रस्ते नुतनीकरणासाठी 80 लाखाच्या निविदा प्रसिद्ध ः आमदार काळे

कोपरगाव प्रतिनिधी : कोपरगाव मतदार संघाच्या ग्रामीण भागातील रस्ते विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून निधी मिळावा यासाठी केले

सुरेगाव शिवारात नऊ एकर ऊस जळून खाक
LokNews24 l महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा विरोधकांचा डाव
अल्पवयीन मुलीला मुंबईला पळवून नेत तिच्यावर अत्याचार

कोपरगाव प्रतिनिधी : कोपरगाव मतदार संघाच्या ग्रामीण भागातील रस्ते विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून निधी मिळावा यासाठी केलेल्या पाठपुराव्यातून 80 लाख रुपये निधीला मंजूरी मिळाली होती. या रस्त्यांच्या कामाच्या निविदा तातडीने प्रसिद्ध करून शीघ्र गतीने कामास प्रारंभ व्हावा यासाठी करीत असलेल्या प्रयत्नातून ग्रामीण भागातील या रस्त्यांच्या नुतनीकरणासाठी 80 लाखाच्या निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत अशी माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.
प्रसिद्ध करण्यात आलेल्या 80 लाखाच्या निविदा मतदार संघातील पुढील कामांच्या असून यामध्ये वडगाव येथील दौलत बाबुराव सोनवणे घर ते संजय सोनवणे घर 1.05 किलोमीटर रस्ता डांबरीकरण करणे, करंजी येथील करंजी ग्रा.मा. 75 ते बोकटा जिल्हा हद्द 01 किलोमीटर रस्ता डांबरीकरण करणे, वेस येथील वेस ग्रा. मा. 52 ते जालिंदर कोल्हे घर ते बहादराबाद हद्द 01 किलोमीटर रस्ता डांबरीकरण करणे व कोळपेवाडी येथील रा.मा. 7 ते कोळपेवाडी (ग्रा.मा. 101) वरील दीपक ढोणे घराजवळील नाला सि.डी. वर्क करणे वरील सर्व कामांसाठी या 80 लाख रुपयांच्या निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या कामांच्या निविदा प्रसिद्ध झाल्यामुळे येत्या काही दिवसातच या सर्वच रस्त्यांच्या कामांना सुरुवात होणार आहे. त्यामुळे मागील अनेक वर्षापासून वरील सर्व गावातील नागरिकांना येत असलेली  मोठी अडचण दूर होणार आहे. त्यामुळे करंजी, वडगाव, वेस व कोळपेवाडी या गावातील ग्रामस्थ व या रस्त्याने नियमितपणे ये-जा करणार्‍या नागरिकांनी व वाहन चालकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे. मागील काही वर्षापासून रस्ते दुरुस्तीचा प्रलंबित प्रश्‍न आ. आशुतोष काळे यांनी केलेल्या अथक पाठपुराव्यामुळे मार्गी लागला आहे त्याबद्दल करंजी, वडगाव, वेस व कोळपेवाडी या गावातील नागरिकांनी आमदार आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.

COMMENTS