ट्रामा केअर सेन्टर आज उभे असते तर परिस्थिती काहीशी वेगळी असती-  कोल्हे

Homeअहमदनगर

ट्रामा केअर सेन्टर आज उभे असते तर परिस्थिती काहीशी वेगळी असती- कोल्हे

कोपरगाव शहर प्रतिनिधी- कोपरगाव येथील ग्रामीण रूग्णालयात ट्रामा केअर युनिट इमारतीच्या कामासाठी प्रशासकीय मान्यता मिळविण्याची प्रक्रिया २०१९

नगरपालिका शाळेत संगणक कक्षाचे उद्घाटन
बसच्या गर्दीत वकिलाचे पैशांचे पाकीट मारले
रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता नागरिकांच्या जीवाशी खेळl पहा LokNews24

कोपरगाव शहर प्रतिनिधी- कोपरगाव येथील ग्रामीण रूग्णालयात ट्रामा केअर युनिट इमारतीच्या कामासाठी प्रशासकीय मान्यता मिळविण्याची प्रक्रिया २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपुर्वी अंतिम टप्प्यात आणून ठेवली असतांना गेल्या वर्षभरापासून विदयमान आमदारांनी सरकारकडे काहीच पाठपुरावा केला नसल्यामुळे आजच्या कोरोनाच्या भयावह परिस्थितीमध्ये रूग्णांची मोठया प्रमाणात हेळसांड होत असल्याची टीका भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव, माजी आमदार सौ स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांनी केली आहे.
कोपरगाव येथील ग्रामीण रूग्णालयामध्ये ट्रामा केअर युनिटची उभारणी करावी म्हणून माइया कार्यकाळात मी तत्कालीन आरोग्य मंत्री यांचेकडे सतत पाठपुरावा केला होता. कोपरगाव शहरालगत असणा-या प्रमुख राज्य मार्ग १२ व राज्यमार्ग ८ या रस्त्यावर असणारी धार्मिकस्थळे श्री साईबाबा तपोभूमी तसेच ऐतिहासिक कचेश्वर मंदिर, दैत्यगुरू शुक्राचार्य मंदिर, श्री संत जनार्दन स्वामी समाधीमंदिर तसेच ओमगुरूदेव जंगलीदास माउली आश्रम, तसेच याच रस्त्यावर काही अंतरावर जागतिक किर्तीचे शिर्डी येथील देवस्थान श्री साईबाबा मंदिर  येत असल्याने मोठया प्रमाणात भाविकांची नेहमी वर्दळ असते. त्याचप्रमाणे शिर्डी येथे पायी पालख्या घेउन जाणारे भाविकही दर्शनासाठी याच मार्गाहून जात असतात. शैक्षणिक संस्था, सहकारी साखर कारखाने व औदयोगिक वसाहत यामुळे मोठया प्रमाणावर वाहतुक असल्याने दुदैवाने अपघात झाल्यास तातडीने अपघातग्रस्तांना उपचार मिळण्यासाठी कोपरगाव ग्रामीण रूग्णालय येथे ट्रामा केअर युनिट व्हावे म्हणून तत्कालीन आरोग्य मंत्री यांचेकडे मागणी केली. या भागासाठी अत्यंत महत्वाची असलेली ही गरज असल्याचे निदर्शनास आणून देत यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. सर्व कागदपत्रीय सोपस्कार पुर्ण करत सुमारे ९ कोटी रूपयाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता मिळावी म्हणून २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपुर्वी दिनांक २८ आॅगस्ट २०१९ रोजी जा.क्र.प्रशा-१/३४२५/सन २०१९ अन्वये अधिक्षक अभियंता,सार्वजनिक बांधकाम मंडळ, अहमदनगर यांनी सादर केलेले आहे. 
आचारसंहितेपुर्वी अंतिम टप्प्यात आलेली ही प्रक्रिया पुर्ण करून ट्रामा केअर युनिट इमारतीचे काम पुर्ण होणे अपेक्षित होते. परंतु विदयमान आमदारांकडून जनतेच्या जीवनमरणाशी संबधित असलेल्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत आहे, ही मतदार संघाच्या दृष्टीने दुर्दैवाची बाब आहे. पाठपुरावा करून कोपरगाव येथे ट्रामा केअर युनिट कार्यान्वित झाले असते,  परंतु पाठपुराव्याअभावी हे काम अदयापही रखडल्यामुळे सध्याच्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या भयावह परिस्थितीमध्ये आरोग्यसेवा मिळण्यापासून नागरीकांना वंचित रहावे लागत आहे. सदर ट्रामा केअर युनिटची इमारत पुर्ण झालेली असती तर आज त्या इमारतीचा उपयोग रूग्णसेवेसाठी झाला असता. असेही सौ कोल्हे म्हणाल्या.
“लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेमुळे सध्याच्या परिस्थितीत आरोग्यसेवेचा पुर्णपणे बोजवारा उडाल्याने नागरीकांना मरणयातना भोगतांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याचे विदारक चित्र मतदार संघात निर्माण झाले असल्याचे सौ कोल्हे म्हणाल्या.”

COMMENTS