Homeताज्या बातम्यादेश

काश्मिरातील पुलवामात बोट बुडाली

श्रीनगर ः जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील पंपोर येथील झेलम नदीत एक बोट बुडाली. बोटीवर 9 गैर-काश्मिरी लोक होते, त्यापैकी 7 जणांना वाचवण्यात

माणिक माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप
शनाया फेम रसिका सुनील ने समुद्रकिनारी गुपचूप उरकला लग्नसोहळा | Filmy Masala (Video)
राज्य सरकारकडून लॉजिस्टिक धोरणाला मंजूरी

श्रीनगर ः जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील पंपोर येथील झेलम नदीत एक बोट बुडाली. बोटीवर 9 गैर-काश्मिरी लोक होते, त्यापैकी 7 जणांना वाचवण्यात आले. मात्र, दोन जण बेपत्ता आहेत. दोघेही यूपीचे रहिवासी आहेत. त्यांच्या शोधासाठी काल रात्रीपासून शोधमोहीम सुरू आहे. एसडीआरएफ, पोलीस प्रशासन आणि निमलष्करी दल बचाव कार्यात गुंतले आहेत. पुलवामाचे उपायुक्त डॉ. बशारत कय्युम यांनी सांगितले की, नदीचा प्रवाह जोरदार असल्याने बचावकार्यात अडचणी येत आहेत. मात्र, बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठी सर्व पथके प्रयत्न करत आहेत.

COMMENTS