Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 वीज पडून श्री क्षेत्र उत्तरेश्वर महादेव मंदिरावरील ५१ फूट धर्मध्वज कोसळला

जालना प्रतिनिधी - घनसावंगी तालुक्यातील कुमार पिंपळगाव सह उक्कडगांव परिसरात विजेच्या कडकडाटांसह पाऊस सुरु आहे. दुपारच्या सुमारास उक्कडगांव येथी

भाजप खासदार उन्मेष पाटलांनी बांधले शिवबंधन
समता सैनिक दल शिबीर संपन्न
सकल हिंदू समाजाच्या वतीने भव्य मोटारसायकल रॅली

जालना प्रतिनिधी – घनसावंगी तालुक्यातील कुमार पिंपळगाव सह उक्कडगांव परिसरात विजेच्या कडकडाटांसह पाऊस सुरु आहे. दुपारच्या सुमारास उक्कडगांव येथील श्र क्षेत्र उत्तरेश्वर महादेव मंदिर समोर उभारण्यात आलेल्या ५१ फूट असलेल्या धर्मध्वजावर अचानक वीज कोसळल्याने या धर्मध्वजाला आग लागून हा ध्वज जळून जमिनीवर कोसळल्याची घटना घडली आहे. आज जिल्ह्यात बदनापूर तालुक्यात ही दुपारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाच्या गाराच्या पावसाने हजेरी लावली तर भोकरदन तालुक्यातील मालखेडा, आव्हाणा, सुभानपुर, गोकुळ, भिवपूर, प्रल्हादपूर, मुठाड, तांदुळवाडी, इब्राहीमपूर, भोकरदन, मनापुर, मलकापूर, वाडी, कुंभारी, कोपार्डा, निमगाव आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला असुन मालखेडा ,आव्हाणा, पेरजापुर, प्रल्हापुर, वाडी, आदी ठीकाणी हरबऱ्या प्रमाणे गारांचा पाऊस पडल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आज झालेल्या या वादळी वाऱ्यासह पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना उकाड्यापासून काही प्रमाणत दिलासा मात्र मिळाला आहे.

COMMENTS