Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

छत्तीसगडमध्ये चकमकीत 7 नक्षलवादी ठार

गडचिरोली ः छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त नारायणपूर जिल्ह्यात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी सात नक्षलवाद्यांना ठार केले. पोलीस अधिकार्‍यांनी ही माहिती

अवैधरित्या गोमांस विक्री करणारे आरोपी जेरबंद
अजय देवगण, सिद्धार्थ मल्होत्राविरोधात खटला दाखल
लखीमपूर-खिरी प्रकरणाच्या साक्षीदारांना सुरक्षा पुरवा- सर्वोच्च न्यायालय

गडचिरोली ः छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त नारायणपूर जिल्ह्यात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी सात नक्षलवाद्यांना ठार केले. पोलीस अधिकार्‍यांनी ही माहिती दिली. या चकमकीत तीन जवान जखमी झाल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. पोलिस अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, नारायणपूर, दंतेवाडा आणि कोंडागाव जिल्ह्यांच्या सीमेवर सुरक्षा दलांनी केलेल्या चकमकीत सात नक्षलवादी ठार झाले. सुरक्षा दल गोबेल भागात असताना नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला, त्यानंतर सुरक्षा दलांनीही प्रत्युत्तर दिले. यात 7 नक्षलवादी ठार झाले.

COMMENTS