Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जामखेडमध्ये व्यापार्‍यावर जीवघेणा हल्ला

सातजणांवर जामखेड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल

जामखेड ः अपघातातील जखमींच्या दवाखान्याचे बील देण्याच्या कारणावरून झालेल्या वादामुळे जामखेड येथील व्यापार्‍यास मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणी

शिवसेना शहर प्रमुखावर चाकू आणि लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला
इंदापूरमध्ये तहसीलदारांवर जीवघेणा हल्ला
नागपुरात माजी नगरसेवकावर जीवघेणा हल्ला

जामखेड ः अपघातातील जखमींच्या दवाखान्याचे बील देण्याच्या कारणावरून झालेल्या वादामुळे जामखेड येथील व्यापार्‍यास मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणी एक जणांसह इतर सहा अनोळखी अशा एकूण सात जणांविरोधात जामखेड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी व्यापार्‍यांनी या मारहाण घटनेचा निषेध करत आरोपींना तात्काळ अटक करून कडक कारवाई करण्यासाठी तहसीलदार व पोलीस स्टेशनला निवेदन दिले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जामखेड येथील व्यापारी नितीन बाफना यांच्या मालकीच्या पीक अप गाडीचा त्यांच्या चालकांकडून सहा दिवसांपूर्वी अपघात घडला होता. या अपघातात पीकअप गाडीने रिक्षाला धडक दिल्याने पाच जण जखमी झाले होते.काही जखमींवर जामखेड येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या जखमीच्या बीलाचा खर्च मागणीसाठी जखमीचे नातेवाईक व्यापारी नितीन बाफना यांच्या दूकानात आले होते. मागत होते. यावेळी त्या ठिकाणी सुरज राऊत (पुर्ण नाव माहिती नाही) त्याच्या सोबत इतर सहा जण अनोळखी होते. तुम्ही दवाखान्याचा व औषधोपचाराचा खर्च का दिला नाही असे म्हणत फिर्यादी व व्यापारी यांच्यात भाडण झाले. यावेळी पैसे मोजण्याचे मशीन,   लोखंडी प्लेट व पाईपने मारहाण करत आरोपींनी व्यापारी नितीन बाफना यांना जखमी केली. या झटपटीत फिर्यादी यांच्या गळ्यातील सहा तोळ्याची सोन्याची चैन गहाळ झाली. या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला व्यापारी नितीन बाफना यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकाँ संतोष कोपनर करत आहेत.

व्यापार्‍यांच्या वतीने घटनेचा निषेध – व्यापार्‍यास झालेल्या मारहाणीच्या घटनेचा व्हिडिओ शहरात पसरताच गुरूवार 30 रोजी व्यापारी व सकल जैन समाजाच्या वतीने दुकाने बंद ठेवून घटनेचा निषेध केला तसेच तहसीलदार गणेश माळी व पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना निवेदन देऊन तातडीने आरोपींना अटक करावी व कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

COMMENTS