Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्वसनविकार असणार्‍या रूग्णांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे : डॉ. स्वप्निल साखला

दुर्गामाता ज्येष्ठ नागरिक संघातर्फे कार्यक्रम

नाशिक : अतिशय गर्दीच्या ठिकाणी आपण गेलो, तर गुदमरून जायला होते आणि मनात भीती निर्माण होते. गम्मत म्हणून जरी कुणी नाक दाबून धरले तरी आपण हात झिडका

भू- करमापक सचिन काठे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.
शेअर बाजार पुन्हा कोसळला
सिंचन प्रकल्पांचे गौडबंगाल  

नाशिक : अतिशय गर्दीच्या ठिकाणी आपण गेलो, तर गुदमरून जायला होते आणि मनात भीती निर्माण होते. गम्मत म्हणून जरी कुणी नाक दाबून धरले तरी आपण हात झिडकारून टाकतो. आपला श्वास अर्थातच आपल्या जगण्याला आवश्यक असतो आणि आपल्याला श्वास घेता येत नाही असे वाटले की आपला जीव घाबराघुबरा होतो. त्यामुळे श्वसन विकाराच्या रूग्णांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे असे प्रतिपादन नारायणी हॉस्पीटलचे श्वसनविकार तज्ञ डॉ. स्वप्निल साखला यांनी केले.

दुर्गामाता ज्येष्ठ नागरिक संघातर्फे मासिक सभेप्रसंगी आयोजित वाढदिवस सोहळ्याच्या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शनपर व्याख्यानात डॉ. स्वप्निल साखला बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शैलेश ढगे, अध्यक्ष रमेश डहाळे, सचिव रविंद्र शहरकर,  श्री . कावळे, कार्याध्यक्ष श्री.चिमणकर, दिलीप सोनोने उपस्थित होते.

डॉ. साखला म्हणाले की, श्वसनाचे विकार आणि मानसिक विकार यांचेही जवळचे नाते आहे. दमा, फुफ्फुसाचा कर्करोग अशा श्वसनाच्या विकारांमध्ये मानसिक विकारांचे प्रमाण बरेच आढळते. तसेच मानसिक ताणतणावांमुळे श्वसनाची लक्षणे दिसून येतात. दमा हा बर्‍याच वेळा लहानपणीच सुरू होतो. दम्यामध्ये श्वासनलिकांना सूज येते. त्यामुळे श्वास घ्यायला त्रास होतो. दम लागतो आणि त्यावेळेस जीव घाबराघुबरा होतो.  त्यामुळे बर्‍याचवेळा दम्याबरोबरच डिप्रेशन, चिंता यासारखे मानसिक आजार होतात. लहानपणी दमा असेल तर तरुणपणी चिंतेचे विकार जास्त प्रमाणात होतात. त्या त्या वेळेला असलेल्या ताण तणावांचा दम्याचा त्रास होण्याशी प्रत्यक्ष संबंध असतो. घडलेल्या घटना, कामाचा ताण, नातेसंबंधांमधील संघर्ष, प्रतिकूल परिस्थिती या सगळ्यामुळे दम्याचा अटॅक येऊ शकतो. यासाठी वेळोवेळी आपल्या श्वसनविकार तज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी कार्यक्रमास मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

COMMENTS