पुणे ः पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात दोन अल्पवयीन मुलींना गुंगीचे इंजेक्शन देऊन त्यांच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा खळबळजनक प्र
पुणे ः पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात दोन अल्पवयीन मुलींना गुंगीचे इंजेक्शन देऊन त्यांच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी दोन आरोपी तरुणांना अटक केली असून, त्यांच्याबरोबर असलेल्या इतर साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अजय भिकेन दौड (वय 29, रा. सातकरस्थळ, ता. खेड, जि. पुणे), श्रीराम संतोष होले (वय 23, रा. होलेवाडी, ता. खेड, जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत. याप्रकरणी त्यांचा साथीदार किरण याच्याविरुद्ध देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलींना ओळखीचे आरोपी अजय आणि श्रीराम यांनी दुचाकीवर फिरायला नेण्याचा बहाणा करून शिरुर परिसरात नेले. तेथील एका डोंगरावर आरोपींचा मित्र किरण याने दोघींना इंजेक्शन देण्याचा प्रयत्न केला. इंजेक्शन घेतले नाही तर इथेच सोडून जाऊ, अशी धमकी दिल्याने मुली घाबरल्या. त्यानंतर पुन्हा किरणने दोघींना इंजेक्शन दिले. आरोपी अजय आणि श्रीराम यांनी दोघींना एका अनोळखी हॉटेलमध्ये नेले. हॉटेलमध्ये दोन खोल्या भाड्याने घेतल्या. त्यानंतर आरोपींनी त्यांच्यावर बळजबरीने बलात्कार केला. त्यानंतर घाबरलेल्या मुलींनी ही बाब काही दिवस लपवून ठेवली होती. मात्र, आरोपींनी दोघींना पुन्हा धमकावल्याने घाबरलेल्या मुलींना याबाबत खेड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अतिरिक्त अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने तपास सुरू करण्यात आला. खेड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजकुमार केंद्रे, उपनिरीक्षक माधवी देशमुख, डी. एन. राऊत, रामदास बोर्हाडे, प्रवीण गेंगजे, एस. डी. बांडे, स्वप्नील लोहार, सागर शिंगाडे, निलम वारे यांनी पसार झालेल्या दोघा आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक केली.
COMMENTS