Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोरोना संकटात नीलेश लंके यांची ऐतिहासिक कामगिरी

खासदार शरद पवार यांचे गौरवोदगार

अहमदनगर ः ज्यावेळी कोरोनाचे संकट देशावर होते त्यावेळी अनेक लोक परदेशात गेले, घराच्या बाहेर पडले नाहीत. परंतू पारनेरसारख्या दुष्काळी भागात एक स्वत

शरद पवारांना नागालँडमध्येही धक्का
शरद पवारांना एनडीएत आणण्याचा होता डाव
नैतिकता आणि भाजपमध्ये विरोधाभास ः शरद पवार

अहमदनगर ः ज्यावेळी कोरोनाचे संकट देशावर होते त्यावेळी अनेक लोक परदेशात गेले, घराच्या बाहेर पडले नाहीत. परंतू पारनेरसारख्या दुष्काळी भागात एक स्वतंत्र यंत्रणा उभी करून कोरोना बाधितांना अखंडपणे सुविधा उपलब्ध करून देत त्यांची सेवा करण्याचे ऐतिहासिक काम कोणी केले असेल तर ते नीलेश लंके यांनी केले असल्याचे सांगत गरीबांचे सेवा करणार्‍या उमेदवाराला मोठया मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. नीलेश लंके यांच्या प्रचारार्थ नगर येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेत शरद पवार बोलत होते. यावेळी संजय राऊत, बाळासाहेब थोरात, अनिल देशमुख, उत्तम जाणकर, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, हिंदकेसरी संतोष वेताळ यांच्यासह जिल्हयातील अनेक मान्यवर तसेच मोठा जनसमुदाय यावेळी उपस्थित होता.  
          यावेळी बोलताना पवार म्हणाले, निवडणूकीत परिवर्तन करण्यासाठी स्वच्छ चारित्र्याचा उमेदवार नीलेश लंके यांच्या रूपाने निवडला असून त्यांना विजयी करण्याची तुमची माझी जबाबदारी आहे. मोदींच्या राज्यात लोकशाही आहे का किंवा कितपत राहणार आहे याची चिंता वाटण्याजोगी परिस्थिती आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना जनतेने तीनदा निवडून दिले, लोक त्यांच्या पाठीशी आहेत. ते तुरूंगात आहेत. झारखंडचे आदिवासी मुख्यमंत्री मोदींच्या धोरणाला विरोध करतात म्हणून तुरूंगात आहेत. संजय राऊत, अनिल देशमुख यांनाही तुरूंगात डांबण्यात आले. सत्ता ही जनतेच्या हितासाठी वापरायची असते मात्र विरोधात बोलला की तुरूंगात डांबत सत्तेचा गैरवापर करण्यात येत असल्याचे पवार म्हणाले. जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक झालीय काय ? निवडणूका घेतल्या नाही, त्यानंतर लोक गप्प बसले व त्यानंतरच्या काळात घटना बदलून आपल्या सोईचा कारभार करण्याचे धोरण असेल तर आपल्याला विचार करावा लागेल असेही पवार म्हणाले.

लंके यांच्या कौतुकाचा विरोधकांना त्रास ः थोरात   – कोरोना काळात केलेल्या कामामुळे नीलेश लंके यांचे जगभर कौतुक झाले. राज्यातले सरकार बदलल्यानंतर जिल्हयातले महसूलमंत्री झाले आणि लंके यांच्या कौतुकाचा त्रास होऊ लागला. लंके यांना आणि जिल्हयालाही त्रास झाला. खोटया केसेस करणे, कामे बंद करणे, त्रास देणे, परवानगीशिवाय भुमीपुजन करण्यास मज्जाव करणे असा त्रास प्रत्येक तालुक्यात झाला. विधानसभा निवडणूकीत हे सगळे आपण बोलणारच आहोत. या पेटलेल्या भटटीतून, त्या अग्निदिव्यातून काय बाहेर आले असेल त्यातून नीलेश लंके यांच्यासारखा कार्यकर्ता तावून सुलाखून बाहेर आला आहे. लंके लोकप्रिय होतोय हे थांबविण्यासाठी आणखी त्रास सुरू झाला असल्याची टीका काँगे्रस नेते बाळासाहेब थोरात यांनी केली.

शांतीच्या मार्गात मोदींचा अडथळा – मोदींनी नगरमध्ये मुस्लिम समाजाविषयी वक्तव्य केले. या देशात सर्व समाजाला एकसंघ ठेवण्याची आवष्यकता आहे. तरच आपला देश प्रगतीच्या रस्त्यावर जाईल. शांतीचा संदेश महात्मा गांधींनी दिला. याच शहरातील आचार्य आनंदॠषीजी यांनीही शांतीचा दिला. या रस्त्याने जाताना आपला सर्वात मोठा अडथळा नरेंद्र मोदी व त्यांच्या सहकार्‍यांचा असल्याची टीका शरद पवारांनी यावेळी केली.

कॉमन मॅन इज सुपर मॅन ः संजय राऊत – नीलेश लंके यांच्यासारखा फाटका, फकीर उमेदवार. तुमच्या आमच्यातला सच्चा माणूस. शिवाय ओरीजनल शिवसैनिक आहे. आजूनही शिवबंधन तोडलेले नाही त्यांनी. शिवबंधन मनगटावर आणि मनातही आहे. त्यांची पत्नी, आई, वडील खाली बसले आहेत कारण हा उमेदवार मुळचा शिवसैनिक आहे. तुतारी आपलीच आहे. तुतारी ते वाजवतील एका हातात मशाल घेउन  शिवाय पंजाही सोबत आहे. नीलेश लंके संसदेत जाणार कारण कॉमन मॅन इज सुपर मॅन. लंके हे सामान्य माणसाचे प्रतिनिधी असल्याचे कौतुक खासदार संजय राऊत यांनी केले.

COMMENTS