Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तब्बल 23 लाखाची अवैध दारू जप्त  

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई;

मुंबई  : उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने ठाणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी 7 मे रोजी अवैध दारू निर्मिती करणार्‍यांवर कारवाई केली. या संपूर्ण का

निळवंडेचा लोकार्पण कृती समितीचे आंदोलक स्थानबद्ध
30 एप्रिलपर्यंत सरसकट संपूर्ण बाजारपेठा बंद ठेवण्याचा निर्णय
पोलिसानं सास-यावर गोळ्या झाडून केली हत्या l DAINIK LOKMNTHAN —————

मुंबई  : उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने ठाणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी 7 मे रोजी अवैध दारू निर्मिती करणार्‍यांवर कारवाई केली. या संपूर्ण कारवाईमध्ये 59 हजार 980 लीटर दारू व इतर भट्टी साहित्यासह एकूण 23 लाख 55 हजार 210 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई ठाणे जिल्ह्यातील दिवा गाव, घेसर, खर्डी, अलीमघर, छोटी देसाई, मोठी देसाई, आगासन, सरळांबे, अंजुर, वाशाळा, वासरगाव, हाजी मलंग, कुशिवली, माणेरागाव, द्वारलीपाडा, कुंभार्ली, केवणी, कालवार, वडुनघर, मामेखर्डी, कारीवली, मामणोली, जांभुळगांव, नांदपगाव, केशव सृष्टी, उत्तन, मुरदागाव, कोपराखाडी, गोराई खाडी आदी ठिकाणी करण्यात आली आहे. या संपूर्ण कारवाईमध्ये 31 दारूबंदी गुन्हे नोंद करण्यात आले आहे. राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी, संचालक प्रसाद सुर्वे, कोकण विभागीय उप आयुक्त प्रदीप पवार, ठाणे अधीक्षक एन. व्ही सांगडे, उपअधीक्षक एस. टी माळवे, मुंबई शहरचे उपअधीक्षक सुधीर पोकळे, मुंबई उपनगर उपअधीक्षक मनोज चव्हाण, सुनील जाधव, जे. एस गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच लोकसभा निवडणूक आचार संहितेचे गांभीर्य लक्षात घेता उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकांनी ही कारवाई केली आहे. ही कारवाई संबंधित विभागाचे निरीक्षक, दुय्यम निरीक्षक, जवान  यांनी केली आहे, असे कोकण उपआयुक्त प्रदीप पवार यांनी कळविले आहे.

COMMENTS