Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मैत्रिणींचे फोटो प्रियकरास पाठवणार्‍या तरूणीवर गुन्हा

पुणे ः पुणे शहरातील एका नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहात राहत असलेल्या तरुणीने तिच्या सोबत राहणार्‍या तीन मैत्रिणींचे नकळत कपडे ब

पत्नी घटस्फोट देत नव्हती म्हणून सासरवाडीतील चौघांना पेटवले .
महिलेचा विनयभंग तरी गुन्ह्यात नोंद नाही
वाहनावर कारवाई केल्याने वाहतूक पोलिसाला चक्क नेले 800 मीटर फरपटत .

पुणे ः पुणे शहरातील एका नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहात राहत असलेल्या तरुणीने तिच्या सोबत राहणार्‍या तीन मैत्रिणींचे नकळत कपडे बदलतानाचे आक्षेपार्ह फोटो काढून ते तिच्या प्रियकरास पाठवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पिडित तरुणींनी महाविद्यालय प्रशासनाला माहिती दिल्यावर याबाबत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात आरोपी तरुणी व तिचा प्रियकर यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विनीत अजित सुराणा (सध्या रा.हिंजवडी, पुणे) या आरोपीवर त्याच्या मैत्रिणीसह पोलिसांनी विनयभंग व आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीईओपी तंत्रज्ञान विद्यापीठाचे शिवाजीनगर येथे मुलींचे वसतिगृह आहे. सदर ठिकाणी आरोपी तरुणी शिक्षण घेत असल्याने राहण्यास होती. तिच्या खोलीत तीन मैत्रिणी रहाण्यास होत्या. 24 जानेवारी 2023 ते 3 मे 2024 दरम्यान आरोपी मुलीने तिचे साथीदार मुलींचे संमती शिवाय मोबाईल फोनमध्ये कमी कपडयातील व्हिडिओ शुटिंग करुन ते प्रियकर विनीत सुराणा यास मोबाईलवर पाठवले. त्यामुळे सदर मुलींच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न झाली. आरोपी प्रियकर याने व्हॉटसअपद्वारे त्याच्या प्रियेसीला वेळोवेळी मेसेज करुन तु कोठे आहेत असे विचारुन तिचे रुम मधील इतर मुलींचे फोटो व व्हिडिओ मोबाईल मध्ये काढून त्याचे मोबाईलवर पाठविण्यास भाग पाडले. आरोपी मुलीच्या रुम मध्ये राहणार्‍या विद्यार्थीनी मुलींना संबंधित मैत्रिण सतत मोबाईलवर तिच्या प्रियकराशी बोलताना दिसून येत होती.आक्षेपार्ह व्हिडिओबाबत ती त्याच्यासोबत बोलत असताना, एका मैत्रिणीने ही गोष्ट ऐकली. तिने मैत्रिणीचा मोबाईल तपासला असता, त्यात तिच्यासह इतर मैत्रिणींचे कमी कपडयातील, कपडे बदलतानाचे फोटो, व्हिडिओ तिने प्रियकरास पाठविल्याचे निष्पन्न झाले. ही घटना उघडकीस येताच, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रशासनाने सदर मुलीस महाविद्यालयातून निलंबीत केले. तसेच तिला वस्तीगृह तातडीने खाली करण्यास सांगितले आहे. त्याचप्रमाणे याप्रकरणी विद्यार्थीनीचे तक्रारीनुसार एक चौकशी समिती देखील नेमण्यात आली आहे आरोपी प्रियकराने सदर व्हिडिओ इतर कोणाला पाठवले की नाही याबाबत देखील खातरजमा करण्यात येत आहे.

COMMENTS