पंचवटी - अक्षय तृतीयेच्या निमित्ताने पेठ रोडवरील शरदचंद्रजी पवार मार्केट यार्डात तीन दिवसीय अंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. बुधवार ता.०८
पंचवटी – अक्षय तृतीयेच्या निमित्ताने पेठ रोडवरील शरदचंद्रजी पवार मार्केट यार्डात तीन दिवसीय अंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. बुधवार ता.०८ रोजी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती देविदास पिंगळे यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी बाजार समिती संचालक संदीप पाटील, व्यापारी ईश्वर गुप्ता,राजू पिंगळे, राजेंद्र भागवत,मेनूउद्दिन बागवान, विशाल गवळी, राहुल आहेर,मनोज वडगुजर ,दीपक बोधले, सचिन फडे, संतोष रोडगे, सचिन कोठूळे, गोपाळ सानप, रौफ बागवान व व्यापारी आडते उपस्थित होते.तसेच बाजार समिती सचिव प्रकाश घोलप, सहाय्यक सचिव विजू निकम,मनोज महाले , फळ विभाग सर्व कर्मचारी देखील उपस्थित होते.
साडेतीन मुहुर्तांपैकी एक असलेली अक्षय तृतीयेचा सण आज साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर घराघरांत होणाऱ्या पितरांच्या पूजेसाठी लागणाऱ्या पूजा सामग्रीमध्ये आंबा असतो. नैवद्य म्हणून आंबा रस असतो. त्यासाठी शरदचंद्रजी पवार मार्केट यार्डात आंबा घेण्यासाठी गर्दी होत असते. त्या अनुषंगाने नाशिककरांसाठी शरदचंद्रजी पवार मार्केट यार्डात फळ विभागातील एम आर फ्रूट कंपनी,चामुंडा फ्रुट कंपनी व गवळी ब्रदर्स यांनी संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय आंबा महोत्सवाचे आयोजन केले आहे, बुधवार ता.०८ रोजी सकाळी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती देविदास पिंगळे यांच्या हस्ते फीत कापून उद्धघाटन करण्यात आले, जुनागड केशर, रत्नागिरी हापुस, देवगड हापुस, बँगलोर लालबाग, विजयवाडा बदाम, आम्रपाली गुजरात, हैद्राबाद मलिका, रत्नागिरी पायरी, रत्नागिरी केशर या प्रजातींचे नवनविन आंबे उपलब्ध आहे. तरी नाशिककरांनी त्यांचा लाभ घ्या असे आवाहन फळ विभागाचे व्यापारी आडते यांनी केले आहे.
COMMENTS