काश्मिरात बॉम्बस्फोट, जिवीत हानी नाही

Homeताज्या बातम्यादेश

काश्मिरात बॉम्बस्फोट, जिवीत हानी नाही

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधून कलम 370 रद्द करुन आज 2 वर्षे पूर्ण झाल्यामुळे संतापलेल्या पाकिस्तान समर्थीत दहशतवाद्यांनी काश्मिरात गुरूवारी घातपात घडवून

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या आरक्षण सोडत कार्यक्रमास स्थगिती
आबासाहेबांच्या वसतिगृहामुळे माझ्या जीवनाचे सोने झाले
राजकीय सूड उगवण्यासाठी 30 कोटी केले शासनाला परत

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधून कलम 370 रद्द करुन आज 2 वर्षे पूर्ण झाल्यामुळे संतापलेल्या पाकिस्तान समर्थीत दहशतवाद्यांनी काश्मिरात गुरूवारी घातपात घडवून आणण्याचा प्रयत्न केला. श्रीनगरच्या डाउनटाउन परिसरात जामा मशिदीजवळ मोठा ब्लास्ट आणि गोळीबार करण्यात आला आहे. सुदैवाने या हल्ल्यात कुठलीही जिवीतहानी झाली नाही. सध्या पोलिस या हल्ल्यामागील सुत्रधाराचा शोध घेत आहेत.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा कमी तीव्रतेचा आयईडी ब्लास्ट होता. यानंतर दहशतवाद्यांनी हँड ग्रेनेट फेकत गोळीबारही केला. या हल्ल्याच्या काही तासांपूर्वी दहशवाद्यांनी सोपोरच्या मुख्य चौकात गोळीबार केला होता. या दहशतवाद्यांच्या शोधासाठी सर्च ऑपरेशन सुरू झाले आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगिल्यानुसार, दहशतवाद्यांनी पोलिसांवरही दुरून गोळीबार केला, पण कुणालाही गोळी लागली नाही. सुमारे 2 वर्षांपूर्वी 5 ऑगस्ट 2019 रोजी जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटलवल्यानंतर दररोज दहशतवाद्यांसाठी काळा दिवस ठरत आहे. मागच्या दोन वर्षात जम्मू-काश्मीरमध्ये 130 टॉप कमांडर्ससह 459 दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. तसेच, 149 दहशतवाद्यांनी आत्मसमर्पणही केले आहे. या परिवर्तनामुळे खवळलेल्या दहशतवाद्यांनी हा घातपात घडवल्याचा संशय व्यक्त केला जातोय.

COMMENTS