Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उमेदवारांची निवडणूक खर्चाची केली द्वितीय तपासणी

अंतीम तपासणी 11 मे रोजी होणार

शिर्डी ः खर्च निरीक्षक ममता सिंग यांच्या उपस्थितीत शिर्डी लोकसभा मतदारसंघातील सर्व उमेदवारांची निवडणूक खर्चाची द्वितीय तपासणी राहाता येथील निवडणू

बेलापूरात महिलांचे पोलीस बांधवांसमवेत अनोखे रक्षाबंधन l LokNews24
श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे निधन; सातारा शहरावर दु:खाचा डोंगर
कल्याण -विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावर एकाच रात्रीतुन ६ वाहने पलटी

शिर्डी ः खर्च निरीक्षक ममता सिंग यांच्या उपस्थितीत शिर्डी लोकसभा मतदारसंघातील सर्व उमेदवारांची निवडणूक खर्चाची द्वितीय तपासणी राहाता येथील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय येथे पार पडली.
या तपासणीस सर्व 20 उमेदवारांपैकी काही उमेदवार स्वत: व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. याप्रसंगी निरीक्षक ममता सिंग यांनी स्वतः सर्व उमेदवारांच्या खर्चाच्या नोंदवह्यांची काटेकोरपणे तपासणी केली. प्रथम तपासणीनंतर उमेदवारांच्या खर्चाचे दैनंदिन नोंदवही मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली आहे. अंतीम तपासणी 11 मे रोजी पार पडणार आहे. या तपासणीस सर्व उमेदवारांनी त्यांच्या खर्च नोंदवह्यांसह उपस्थित रहावे. उमेदवारांनी निवडणूकीसाठी उघडण्यात आलेल्या बँक खात्यामार्फतच खर्च करण्यात यावा. असे आवाहन खर्च निरीक्षक ममता सिंग यांनी केले आहे. या तपासणीला सहायक समन्वय अधिकारी (खर्च) बाबासाहेब घोरपडे व सचिन धस, सहायक खर्च निरीक्षक विवेक वर्मा, लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता कैलास ठाकरे तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

COMMENTS