नवी दिल्ली ः दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावर रविवारी पहाटेच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली. देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या कारला अज्ञात

नवी दिल्ली ः दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावर रविवारी पहाटेच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली. देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या कारला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या घटनेत एकाच कुटुंबातील 6 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे जखमी झाले आहेत. मृतांमध्ये 3 महिला आणि 3 पुरुषांचा समावेश आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. सध्या मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
COMMENTS