मुंबई ः राज्यातील बहुचर्चित शिखर बँक घोटाळ्या प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनेत्रा पवार आणि इतर आरोपींना मुंबई पोलिस आर्थिक गुन्हे शाखेने दि
मुंबई ः राज्यातील बहुचर्चित शिखर बँक घोटाळ्या प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनेत्रा पवार आणि इतर आरोपींना मुंबई पोलिस आर्थिक गुन्हे शाखेने दिलासा दिला आहे. या घोटाळ्या प्रकरणी कोणतेच पुरावे नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. त्यामुळे या प्रकरणातील सर्व दोषींना दिलासा मिळाला आहे.
ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत अजित पवार यांच्यासह सुनेत्रा पवार यांना देखील या प्रकरणी दिलासा मिळाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी जानेवारी महिन्यात क्लोजर रिपोर्ट सादर केला होता. बँकेच्या कर्ज वाटप आणि साखर कारखाने विक्रीत अनियमितता असल्याचे आरोप अजित पवार आणि इतर आरोपींवर करण्यात आले होते. क्लोजर रिपोर्ट सादर करतांना कर्ज वाटप व साखर कारखाने विक्री संबंधी बँकेला नुकसान झाल्याचे कोणतेच पुरावे नसल्याचे आर्थिक गुन्हे शाखेने म्हटले आहे. त्यामुळे अजित पवार यांना दिलासा मिळाला आहे.
COMMENTS