Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राजकीय पक्षांची जोरदार मोर्चेबांधणी

भाजपचे बैठकांचे सत्र, राष्ट्रवादीचे लोकसभा मिशन

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, लोकसभा आणि त्यानंतर होणार्‍या विधानसभा निवडणुकांना अवकाश असला तरी, सर्वच पक्षांकडून आगामी

Lonand : मुजोर पोलीसांचा पत्रकारांनी केला निषेध (Video)
कर्तृत्ववान मुलाने फेडले आई वडिलांचे पांग… सोमनाथ घोलप  PSI पदी 
धक्कादायक; पतीने स्क्रूड्रायव्हरच्या सहाय्याने पत्नीची केली हत्या | LOK News 24

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, लोकसभा आणि त्यानंतर होणार्‍या विधानसभा निवडणुकांना अवकाश असला तरी, सर्वच पक्षांकडून आगामी निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू असल्याचे चित्र सध्या राज्यात बघायला मिळत आहे. बुधवारी भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा महाराष्ट्राच्या दौर्‍यावर असून, त्यांनी बैठका घेत पुढील रणनीती आखण्यास सुरूवात केली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक घेत लोकसभा निवडणुकीचा आढावा घेतला, तर आजच ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुखांची बैठक घेतल्यामुळे राज्यात सर्वच पक्ष कामाला लागले जोरदार पक्षबांधणीचा कार्यक्रम सुरू आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला पुढील आठवड्यात नऊ वर्षे पूर्ण होत असल्याने भाजप व्यापक जनसंपर्क मोहीम राबविणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी जे. पी. नड्डा मुंबईत आले आहेत. त्यादृष्टीने उद्धव ठाकरे गट हे भाजपचे ‘लक्ष्य’ असून महाविकास आघाडीला भुईसपाट करण्यासाठी जंग जंग पछाडले जाणार आहे. ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकार स्थापन केल्याने भाजपला त्यांचा सूड उगवायचा आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाला हातभार लावून भाजपने त्यांना मुख्यमंत्री करून सत्ताही काबीज केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काही महिन्यांपूर्वी मुंबई दौर्‍यावर असताना ठाकरे गटाला भुईसपाट करण्याचे आवाहन नेते व पदाधिकार्‍यांच्या बैठकीत केले होते. त्यादृष्टीने करण्यात येत असलेल्या निवडणूक तयारीचा गोषवारा, प्रत्येक लोकसभा मतदारसंघ निहाय महापालिका प्रभागांमधील राजकीय परिस्थिती व भाजपची तयारी याचे आढावा नड्डा घेतांना दिसून येत आहे.
दरम्यान, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक पार पडली. समोर आलेल्या माहितीनुसार या बैठकीमध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवर चर्चा झाली आहे. महाविकास आघाडीमध्ये कोणत्या जागेवर लढायचे आणि कोणत्या जागेवर पाठिंबा द्यायचा याबाबत रणनिती ठरवण्यात आली आहे. दरम्यान तालुका आणि जिल्हा अध्यक्ष देखील बदलण्यात येणार असून जे सलग तीन टर्म अध्यक्ष राहिले आहेत, त्यांना बढती देण्याचा मोठा निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याचेही समोर आले आहे. रष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली आज बैठक पार पडली. यावेळी पवार यांनी पक्षातील नेत्यांना कानपिचक्या मारत आमदारांना सूचना दिल्या. यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक सर्व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीची बैठक पार पडली. यावेळी राज्यातील व देशातील घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर पक्षाच्या सद्यस्थितीचा शरद पवार यांनी आढावा घेतला. तसेच काही सूचना देखील दिल्या.

कर्नाटकाचा ट्रेंड महाराष्ट्रात ः शरद पवार –महाविकास आघाडी एकत्रितपणे लोकसभा-विधानसभा निवडणूक लढवणार असून कर्नाटकमध्ये जो ट्रेंड आहे तो महाराष्ट्रात आहे. भाजप नको. त्यांची सत्ता येऊ नये असा मतदाराणी कौल दिला आहे. जनमत भाजपविरोधात आहे. जो पक्ष भाजपबरोबर जाईल त्यांना कर्नाटकमध्ये मत दिले नाही. तसेच महाराष्ट्रात चित्र आहे, असा सल्ला शरद पवारांनी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना दिला असून, कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत.

COMMENTS