Homeताज्या बातम्यासंपादकीय

फसवणुकीचा गोरखधंदा  

गुन्ह्यांची दररोज नव-नवी पद्धत बाहेर येतांना दिसून येत आहे. डिजिटल युगात ऑनलाईन फसवणुकीचे अनेक प्रकार समोर येत असतांना, राज्य सरकारच्या एका विभाग

राजकीय कटूता संपणार का ?
कडवट शिवसैनिक हरपला
प्रदूषणाची वाढती पातळी

गुन्ह्यांची दररोज नव-नवी पद्धत बाहेर येतांना दिसून येत आहे. डिजिटल युगात ऑनलाईन फसवणुकीचे अनेक प्रकार समोर येत असतांना, राज्य सरकारच्या एका विभागालाच गंडा घालण्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे फसवणुुकीच्या या गोरखधंद्याला शिक्षण विभाग देखील बळी पडल्याचे दिसून येत आहे. ऑनलाईन फसवणूकीचे प्रकार वाढले असतांनाच महाराष्ट्र सरकारची एकाच महिन्यात दोनवेळेस फसवणुकीचा गंभीर प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे हा प्रकार बनावट बनावट चेक, बनावट सही आणि बनावट सही करून हा प्रकार करण्यात आल्याचे समोर आले आहे. शिक्षण विभागाची 47 लाखाची तर काही दिवसांपूर्वी पर्यटन विभागाची लाखो रूपयांची फसवणूक करण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. देशामध्ये सध्या ऑनलाईन फसवणुकीचे नव-नव्या पद्धती समोर येतांना दिसून येत आहे. त्यातून सर्वसामान्यांची आयुष्यभराच्या संपत्तीसोबत होणारा घात भयानक असतो. आरोपींची ऑनलाईन फसवणूक करण्याची, गुन्हा करण्याची एकच पद्धत समोर येते, तरी देखील आरोपींना पकडण्यात येत नाही. खरंतर काही दिवसांपूर्वी पर्यटन विभागामध्ये अशाच प्रकारे 67 लाख रूपयांना गंडा घातल्याचे समोर आले होते. याप्रकरणी चौकशी सुरू असतांनाच दुसरा गुन्हा उजेडात आला आहे. वास्तविक पाहता मंत्रालयात प्रवेश करण्यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था असते.

प्रवेश करण्यासाठी पास घ्यावा लागतो, या सर्व बाबींचे सोपस्कार पार कडून गुन्हेगार सरकारच्या खात्यातून पैसे घेऊन जातो, याचाच अर्थ या विभागातील कुणीतरी या आरोपींना, या गुन्हेगारांना माहिती देतो असेच यातून दिसून येत आहे. अंतर्गत बाबी माहिती असल्याशिवाय असे चेक पास होवू शकत नाही. बनावट सही नेमकी अशीच असते, याची माहिती, बनावट चेक बनवणे या बाबी वाटत्या तितक्या सोप्या नाहीत. मात्र आरोपी जर इतर राज्यातील असतील तर, त्यांना अंतर्गत माहिती पुरवणारे ते शिक्षण आणि पर्यटन विभागातील आरोपी कोण, याचा पोलिसांनी शोध घेण्याची खरी गरज आहे. वास्तविक  मंत्रालयात कोणत्याही व्यक्तीला सहज प्रवेश मिळत नाही. प्रत्येक ठिकाणी तपासणी केली जाते. असे असताना मंत्रालयात असा प्रकार घडल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. या प्रकरणात सर्व माहिती असणार्‍या व्यक्तीचाच हात असल्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे पर्यटन विभागातील 67 लाख रूपयांनंतर आता शालेय शिक्षण विभागातील 47 लाख रूपये लंपास करणार्‍यामध्ये नेमका कुणाचा हात आहे, याचे धागेदोरे कुठपर्यंत पोहोचताच, याची माहिती जनतेसमोर येण्याची गरज आहे. ज्या आरोपींच्या खात्यात हे पैसे गेले, ती खाती पश्‍चिम बंगालच्या राज्यात आहे. शिवाय आरोपींकडून खोटे बनावट कागदपत्रे देवून खाते काढण्यात येतात, त्यामुळे आरोपींपर्यंत पोहचणे अशक्य होते. तोच प्रकार या गुन्ह्यात दिसून येत आहे. शिक्षण विभागात बनावट 10 धनादेश वापरून 47 लाख 60 हजार रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. शालेय शिक्षण विभागाच्या खात्यातून काढण्यात आलेले हे पैसे नमिता बग, प्रमोद सिंग, तप कुमार, झिनत खातून या व्यक्तिंच्या खात्यावर जमा झाल्याचे देखील तपासात पुढे आले आहे. वास्तविक पाहता राज्यात गंभीर गुन्हे घडत असतानाच सायबर गुन्हेही गेल्या काही वर्षांत प्रचंड वाढले आहेत. विविध आमिषे दाखवून आर्थिक फसवणूक केली जात असून, बँक खात्यावर ऑनलाईन दरोडेही घातले जात आहे. त्यामुळे ‘हायटेक’ झालेल्या गुन्हेगारांना रोखण्याचे आव्हान पोलिस दलापुढे उभे ठाकले आहे. इंटरनेट आणि मोबाईलने मोठी क्रांती केली आहे. मात्र डिजिटल युगाची क्रांती दुधारी शस्त्र ठरतांना दिसून येत आहे. कारण ग्रामीण भागातील तसेच, मध्यमवर्गीयांमध्ये डिजिटलसंदर्भातील माहिती नसल्यामुळे सायबर क्राईमवाले याचा दुरूपयोग करतांना दिसून येत आहे. 

COMMENTS