Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राहाता नगरपालिकेच्या पाणी साठवण तलावाजवळ आढळला मृतदेह

राहाता : राहाता नगरपालिकेचा पाणी साठवण तलाव असलेल्या कात नाल्याचे कंपाऊंड लगत गाठोड बांधून गादीत गुंडाळलेल्या स्थितीतील अंदाजे 25 ते 35 वर्ष वयाच

‘इन्फ्लूएंझा’ रोखण्यासाठी आरोग्य विभागाने सतर्क राहावे ः आ. आशुतोष काळे
शिक्षक बँकेच्या निवडणुकीने दिले सव्वा लाखाचे उत्पन्न ; साडेआठशेवर उमेदवारी अर्ज दाखल
एसबीसी प्रवर्गाला स्वतंत्र 2% आरक्षण मिळावे यासाठी राज्यात आंदोलनाला प्रारंभ

राहाता : राहाता नगरपालिकेचा पाणी साठवण तलाव असलेल्या कात नाल्याचे कंपाऊंड लगत गाठोड बांधून गादीत गुंडाळलेल्या स्थितीतील अंदाजे 25 ते 35 वर्ष वयाचे इसमाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याची खळबळ जनक घटना शनिवारी उघडकीस आली आहे. मृतदेह खूपच कुजलेल्या अवस्थेत असल्याने लगेच ओळख पटू शकली नाही पोलीस व नगरपरिषद कर्मचार्‍यांनी हा मृतदेह शवविच्छेदना नंतर खड्डे घेऊन पुरून टाकला आहे .खूपच कुजलेल्या अवस्थेत असल्याने मृतदेहाची ओळख लगेच पटू शकली नाही. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी करून तपासाची चक्र फिरवली आहे.
याबाबतचे वृत्त असे की शनिवारी सकाळच्या सुमारास नगरपरिषदेचे पाणीपुरवठा विभाग प्रमुख अशोक साठे तसेच आरोग्य विभाग प्रमुख विजयकुमार आवारे व रवींद्र बोठे यांना पाणीपुरवठा फिल्टर हाऊसचे पंप चालक रघुनाथ जारे यांनी फोन द्वारे माहिती दिली की कंपाउंड जवळ एक गाठोडे दिसत असून त्यातून खूप दुर्गंधी येत आहे. त्यात काहीतरी संशयास्पद आहे. तुम्ही तात्काळ इकडे या असे सांगितले त्यानंतर पाणीपुरवठा विभाग प्रमुख साठे व स्वच्छता निरीक्षक विजय कुमार आवारे व रवींद्र बोठे घटनास्थळी गेले परिस्थिती बघता घटनास्थळी सफाई कर्मचार्‍यांना बोलावून घेतले व ते गाठोडे सोडत असताना त्यात एक पाकीट व माणसाच्या पाया सारखे हाडे दिसले असता. कर्मचार्‍यांनी गाठोडे सोडण्याचे थांबवून तात्काळ राहाता पोलीस स्टेशनला फोन केला काही क्षणातच राहाता पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सोपानराव काकड पोलीस पथकासह घटनास्थळी हजर झाले. त्यानंतर गाठोडे सोडून पाहणी केली असता त्यात अंदाजे 25 ते 35 वर्ष वयाचा मानवी मृतदेह आढळून आला आहे. व काही कागदपत्र आढळून आले मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने राहाता ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरांनी जागेवरच मृतदेहाचे शवविच्छेदन केले. त्यानंतर नगरपरिषदेचे कर्मचारी व पोलिसांनी जेसीबीच्या साह्याने खड्डा खोदून मृतदेह पुरुन टाकला सदर घटनेची माहिती समजतात श्रीरामपूर विभागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैभव कलूबरगे व शिर्डीचे पोलीस उपाधीक्षक शिरीष वमने यांनी घटनास्थळी भेट दिली व सूचना केल्या हा प्रकार नेमका कशामुळे कोणत्या कारणाने घडला हा मृतदेह कोणाचा व कोणी आणून टाकला खून की घातपात का अन्य काही प्रकार आहे.हे आता पोलीस तपासात उघड होईल या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक सोपानराव काकड करीत आहे.

COMMENTS