Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोपरगावात डॉ. आंबेडकरांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी

वैशाली धाकुळकर यांचे प्रबोधनात्मक एकपात्री नाट्य "मी सावित्री बोलते" उत्साहात कोपरगाव शहर : भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची रविवा

वाहतुकीला अडथळा ठरणारी वाहने पोलिसांच्या रडारवर ; शहर वाहतूक शाखेची दंडात्मक कारवाई
नगरमध्ये त्या पाच जणांच्या चौकशीची उत्सुकता ; बोठेला मदत; आणखी काहीजण पोलिसांच्या रडारवर
सत्यजीत तांबे यांच्या पाठपुराव्यातून शिर्डी येथे जिल्हा पर्यटन माहिती केंद्र सुरू होणार

वैशाली धाकुळकर यांचे प्रबोधनात्मक एकपात्री नाट्य “मी सावित्री बोलते” उत्साहात

कोपरगाव शहर : भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची रविवारी 14 एप्रिल रोजी असलेली जयंती संबंध जगभर विविध उपक्रमाने अगदी उत्साहात साजरी केली जात असून त्याच अनुषंगाने कोपरगाव शहरात देखील वेगवेगळ्या संघटनांनी आपापल्या पद्धतीने डॉ बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करत महामानवस अभिवादन केले.
रिपब्लिकन सेना व फुले-आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने रिपब्लिकन सेनेचे संस्थापक आनंदराज आंबेडकर व प्रदेशाध्यक्ष काकासाहेब खंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी दि 13 एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती उत्सवा निमित्त ज्योती सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष रवीकाका बोरावके यांच्या अध्यक्षतेखाली अमरावती येथील वैशाली धाकुळकर यांचे प्रबोधनात्मक एकपात्री नाट्य मी सावित्री बोलते आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी रिपब्लिकन सेनेचे परशराम साबळे, यादवराव त्रिभुवन, गोरख रोकडे, अरविंद विघे, विजय शिंगाडे, रायभान पगारे, आप्पासाहेब पाठक आदीं सह मोठ्या संख्येने महिला व पुरुष उपस्थित होते. तर सम्राट असंघटित कामगार बहुउद्देशीय सेवाभावी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत बागुल यांच्या संकल्पनेतून मनोहर कोकाटे, विलास जाधव, शितल देशमुख, प्रकाश शिंदे आदींच्या उपस्थितीत कोपरगाव शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ उपस्थित सर्व भिम अनुयायांना गोड लाडू चे वाटप करण्यात आले तर अनेकांनी उन्हाची तीव्रता बघता थंड पाण्याच्या बाटल्या, आइस्क्रीम आदी थंड पेयाचे वाटप करत महामानवास अभिवादन करण्यास आलेल्या मोठ्या संख्येने ग्रामीण भागातील भीमअनुययांची तहान भागवत होते.

COMMENTS