
मुघलांच्या काळात भारतीय चलन हे गोल्ड स्टॅंडर्ड होते. परंतु, त्यानंतर येणाऱ्या राज्यकर्त्यांनी गोल्ड आणि सिल्वर स्टॅंडर्ड हटवून रूपयाचे अवमूल्यन करण्याची परंपरा निर्माण केली. ज्यामुळे रूपयाचे मूल्य अस्थिर होते आणि महागाई वाढत जाते.या संदर्भात एक लहान उदाहरण घेऊया. गोल्ड आणि सिल्वर स्टॅंडर्ड चलनात १७५ ग्रॅम सोने आणि चांदीची नाणी चलनात असत. यामुळे त्या चलनात त्यांच्या किंमती एवढे सोने- चांदी असल्यामुळे, त्या चलनाची किंमत स्थिर राहून वस्तुंचे भावही स्थिर राहतात. यामुळे सामान्य माणसाला महागाई ला सामोरे जावे लागत नाही. परंतु, ब्रिटीशांनी भारतात गोल्ड, सिल्वर स्टॅंडर्ड ऐवजी गोल्ड, सिल्वर एक्सचेंज चलन स्विकारल्याने रूपयात त्याच्या किंमती एवढे सोने, चांदी असण्याची शक्यताच नसल्याने, रूपया अस्थिर होवून महागाई वाढू लागते. अशा प्रकारची चलन व्यवस्था ही सर्वसामान्यांची लूट करणारी म्हणजे महागाई आणि बेरोजगारी ला निमंत्रण देणारी ठरते.
आज प्राॅब्लेम ऑफ रूपी या ग्रंथाला शंभर वर्षे होवून गेले; तरीही, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या या सिध्दांताची उपयुक्तता तितकीच किंबहुना त्यापेक्षा आज अधिक आहे. आज देशात बेरोजगारी आणि महागाई कमालीची वाढली आहे. आपल्या चलनाचा विनिमय दर डाॅलर च्या तुलनेने ठरतो. परंतु, नोटा छापण्याचा अधिकार जो सरकारकडे असतो, त्यास डॉ. आंबेडकर यांचा विरोध होता. वर्तमान सरकाने मोनिटायझेन च्या नंतर हेच केले. चलन फुगवटा करून रूपयाचे मूल्य सतत अस्थिर करून देशातील गरीबांच्या हातातील पैसा महागाईच्या रूपाने खेचून घेताहेत. त्यातून देशातील काही भांडवलदारांचा फायदा होऊन, जनता लूटली जात आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेल्या आर्थिक सिध्दांताना अंमलात आणण्यासाठी आपल्याला आता आग्रही व्हावे लागेल, हेच त्यांना खरे अभिवादन ठरेल!
COMMENTS