Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिर्डी उपविभागातील 16 गुन्हेगार तडीपार

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कारवाई

राहाता ः आगामी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने शिर्डी उपविभागातील कोपरगाव शहर, कोपरगाव तालुका, शिर्डी, राहाता व लोणी पोलीस स्टेशन हददीतील सराईत गु

LokNews24 l रेखा जरे यांच्या यशस्विनी बिग्रेडच्या लेटरपॅडचा बाळ बोठेकडून खंडणी उकळण्यासाठी दुरुपयोग?
संजीवनीच्या तीन अभियंत्यांची किर्लोस्करमध्ये नोकरीसाठी निवड                    
संभाव्य आपत्तीचे योग्य नियोजन करा – आ. आशुतोष काळे

राहाता ः आगामी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने शिर्डी उपविभागातील कोपरगाव शहर, कोपरगाव तालुका, शिर्डी, राहाता व लोणी पोलीस स्टेशन हददीतील सराईत गुन्हेगार, उपद्रवी इसम, तसेच सामाजिक शांतता भंग करणारे इसमांविरुदध प्रभावी प्रतिबंधक कारवाई प्रस्तावीत करुन शिर्डी उपविभागातील 16 गुन्हेगारांना जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत.
शिर्डी उपविभाग हददीतील एकूण 36 इसमांविरुदध महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 55, 56 व 57 अन्वये कारवाई करण्यात आलेली असून प्रस्तावीत हददपार इसमांविरुदध पोलीस स्टेशन स्तरावर प्रस्ताव तयार करुन घेऊन पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांचे शिफारशीने उपविभागीय अधिकारी शिर्डी भाग यांना प्रस्ताव सादर करण्यात आले होते. उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी विभाग शिर्डी यांनी उपविभागीय अधिकारी यांचे आदेशान्वये हददपार चौकशी करुन एकुण 36 इसमांविरुदध चौकशी करुन चौकशी अहवाल सादर केले असता,उपविभागीय अधिकारी, शिर्डी भाग यांनी खालील 16 इसमांना अहमदनगर जिल्हयाचे हददीतुन हददपार केलेले आहे. उर्वरीत इसमांविरुदध हददपार कारवाईचे कामकाज सुरु आहे. या 16 गुन्हेगारांमध्ये अर्जुन भाऊसाहेब गुरुळे रा. मुर्शतपुर, ता. कोपरगाव, अजय उर्फ अर्जुन गणेश पाटील रा. गांधीनगर कोपरगाव, कृष्णा संजय कापसे रा. कोपरगाव, उमेश तान्हाजी वायदंडे रा. गणेशनगर, राहाता, रवि राजेद्र बनसोडे रा. शिर्डी ता. राहाता, विशाल कैलास वंसांडे रा. सावळीविहीर, आकाश रविद्र मोकळ रा. शिर्डी ता. राहाता,  विशाल मायकल मोकळ रा. राहाता, महेश कृष्णा मैड रा. लोणी बु. ता. राहाता, अमर बाळु भोसले रा. प्रवरानगर ता. राहाता, दिपक उर्फ राहुल कैलास वाघमारे रा. सावळी विहीर ता. राहाता, आदेश दत्तात्रय नागरगोजे रा. शिर्डी ता. राहाता, सुदाम साहेबराव काळे रा. शिर्डी ता. राहाता, देवराम वाल्मिक कोळपे रा. कोळपेवाडी ता. कोपरगाव, रामदास उर्फ राम लहु कुंडलके रा. कोळपेवाडी ता. कोपरगाव, गणेश संजय कोळपे रा. कोळपेवाडी ता. कोपरगाव, तसेच शिर्डी विभागातील नकुल धर्मराज ठाकरे रा. गांधीनगर कोपरगाव, योगेश संजयकोळपे रा. कोळपेवाडी ता. कोपरगांव यांना महाराष्ट्र झोपडपटटी गुंड, हातभटटीवाले, औषधी द्रव्ये, विषयक गुन्हेगार,धोकादायक व्यक्ती व दृकश्राव्य विनापरवाना प्रदर्शन करणार्‍या व्यक्ती (व्हिडीओ पायरेटस), वाळु तस्कर आणि अत्यावश्यक काळया वस्तुंचा काळा बाजार करणार्‍या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालणेबाबतचा अधिनियमचा 1881 चे (एमपीडीए) कलम 3 (1) अन्वये स्थानबदध करण्यात आलेले आहे.सदरची कारवाई ही राकेश ओला पोलीस अधीक्षक, अहमदनगर, वैभव कलुबर्मे अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपुर यांचे मार्गदर्शनाखाली शिरीष वमने उपविभागीय पोलिस अधिकारी शिर्डी विभाग शिर्डी तसेच शिर्डी विभागातील कोपरगाव शहर, कोपरगाव तालुका, शिर्डी, राहाता, लोणी पोलीस स्टेशनचे प्रभारी, दुय्यम अधिकारी व कर्मचारी यांनी केली आहे.

COMMENTS