Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाजप खासदार उन्मेष पाटील ठाकरे गटाच्या वाटेवर

आज पक्षात प्रवेश होण्याची शक्यता जळगावात भाजपला धक्का

मुंबई ः भाजपचे जळगाव जिल्ह्याचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचे लोकसभेचे तिकीट कापल्यामुळे ते नाराज असून, ते ठाकरे गटात प्रवेश करण्याची शक्यता

वर्तमान क्रिकेटमधील वादग्रस्त घटना व त्यांचे पडसाद 
लग्नाच्या आदल्या दिवशी नवरदेवाचे अनैतिक संबंध उघड ; थेट वरात पोलीस स्टेशनला
उस्मानाबाद तालुक्यात आमदारांनी राखला गड,

मुंबई ः भाजपचे जळगाव जिल्ह्याचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचे लोकसभेचे तिकीट कापल्यामुळे ते नाराज असून, ते ठाकरे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. उन्मेष पाटील यांनी मंगळवारी मातोश्रीवर उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची भेट घेतली. त्यामुळे ठाकरे गट जळगावमधून त्यांना उमेदवारी देण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
यासंदर्भात बोलतांना संजय राऊत म्हणाले की, उन्मेष पाटील यांचे काम व प्रतिमा चांगली असून त्यांचे तिकीट कापले का गेले यांचे आम्हाला आश्‍चर्य वाटले, ते भेटले चर्चा केली ते अस्वस्थ आहे, असे राऊत यांनी म्हटले आहे. उन्मेष पाटील यांच्यासह त्यांचे शेकडो सहकारी हे ठाकरे गटात प्रवेश करण्याच्या विचारात आहेत. तुम्हाला उद्यापर्यंत बातमी मिळेल. आता या संदर्भात उद्धव ठाकरेंशी चर्चा करण्यासाठी ते मातोश्रीवर गेले असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. त्यामुळे उन्मेष पाटील ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे. जळगावचे भाजप खासदार उन्मेश पाटील यांनी मंगळवारी आधी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली, त्यानंतर त्यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. भाजप खासदार थेट मातोश्रीवर पोहोचल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. लोकसभा निवडणुकीची उमेदवारी न दिल्याने नाराज असलेले भाजप खासदार उन्मेष पाटील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. पाटील हे मुंबईत संजय राऊत यांची भेट घेण्यासाठी आले आहेत. यामुळे ठाकरे गट भाजपला जळगावमध्ये तगडा झटका देण्याच्या तयारीत आहे. स्मिता वाघ यांना जळगाव लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यानंतर उन्मेश पाटील हे नाराज असल्याची चर्चा असून या संदर्भात ती आपली पुढील भूमिका जाहीर करतील, अशी माहिती आहे.

COMMENTS