Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

करंजी शाळेतील विद्यार्थ्यांनी केली उन्हाळ्यात पक्षांना पाण्याची आणि अन्नाची सोय

कोपरगाव शहर ः रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर शंकररावजी काळे माध्यमिक विद्यालय, करंजी बु. ता. कोपरगाव येथील विद्यार्थ्यांमार्फत उन्हाळ्यात पक्षांना

Sangamner : संगमनेर नगरपालिकेच्या गटार पाणी शुद्धीकरण प्रकल्पास स्थानिकांचा विरोध l Lok News24
अकोल्यात शाळांना शैक्षणिक साहित्य वाटप
निमगांव खैरी सोसायटीच्या अध्यक्षपदी माणिक भागडे

कोपरगाव शहर ः रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर शंकररावजी काळे माध्यमिक विद्यालय, करंजी बु. ता. कोपरगाव येथील विद्यार्थ्यांमार्फत उन्हाळ्यात पक्षांना पाण्याची आणि अन्नाची टंचाई भासू नये म्हणून पक्षी संरक्षण मोहीम चालू करण्यात आलेली आहे. विद्यालयातील उपशिक्षक ललित प्रकाश जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास 40 ते 50 विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला आहे.
सध्या मार्च महिना सुरू असून या महिन्यापासून उन्हाळ्याची तीव्रता जाणवायला सुरुवात होते. या काळात पाणवठे सुकायला लागून शेतीतील पिके ही निघालेली असतात. त्यामुळे निसर्गात वावरणार्‍या पक्षांना या काळात पाण्याची आणि अन्नाची टंचाई जाणवते. पाण्याच्या आणि अन्नाच्या दुर्भिक्षेमुळे प्रसंगी पक्षांचा जीवही जातो. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर कर्मवीर शंकररावजी माध्यमिक विद्यालय करंजी बु. ता. कोपरगाव या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी पक्षांची पाण्याची आणि अन्नाची दुर्भिक्षिता टाळावी म्हणून विद्यालयातील उपशिक्षक  ललित प्रकाश जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षांसाठी अन्न आणि पाण्याची सुविधा उपलब्ध करणारे विविधरंगी आणि विविध आकाराचे प्रतिकृती तयार केल्या व त्यात रोज पाणी आणि धान्याचे कण ठेवल्यामुळे पक्षांना अन्नाची आणि पाण्याची उपलब्धता निर्माण झाली आपण निसर्गाचे देणे लागतो आणि या भावनेतून या लहान विद्यार्थ्यांनी अतिशय सक्षमतेने या उपक्रमात सहभाग नोंदवला आहे.विद्यार्थ्यांच्या या सहभागाबद्दल विद्यालयाच्या स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन तथा रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य कारभारी आगवन तथा स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य, विद्यालयाचे मुख्याध्यापक दिनकर महिपत माळी यांच्या सह करंजी पंचक्रोशीतील शिक्षण प्रेमी नागरिकांनी विद्यार्थ्यांच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या असून या कामी विद्यालयातील उपशिक्षक संदीप चव्हाण, देविदास झाल्टे, राधाकिसन टाकसाळ, सिद्धार्थ बर्डे, गजानन सांगळे, सचिन डांगे, सुनील पिंपळे, अनिल सरोदे, गवनाथ डोखे आदींनी मोलाचे सहकार्य केले.

COMMENTS