Homeताज्या बातम्यादेश

प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांचा भाजपात प्रवेश

  नवी दिल्ली प्रतिनिधी - प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल  यांनी राजकारणात एन्ट्री केली असून त्यांनी भाजपचं कमळ हाती घेतलं आहे. अवघ्या काही वेळा

जम्मूतील डोडात पुन्हा चकमक
लिंबागणेश पंचक्रोशीतील  पोखरी, बेलगाव , सोमनाथवाडी, पिंपरनई  नुकसानग्रस्त भागाची पाहणी
महात्मा फुलेंनी वंचित घटकाला न्याय देण्याचे काम केले: प्रतापराव ढाकणे

  नवी दिल्ली प्रतिनिधी – प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल  यांनी राजकारणात एन्ट्री केली असून त्यांनी भाजपचं कमळ हाती घेतलं आहे. अवघ्या काही वेळामध्ये लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे. 16 मार्च 2024 रोजी दुपारी 3 वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडणार आहे. यामध्ये देशातील निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला जाईल. त्यातच देशात आचारसंहिता लागू होण्यापूर्वी अनेक राजकीय प्रवेश होत असल्याचं पाहायला मिळतंय. यातच आता अनुराधा पौडवाल यांनी देखील भाजपचं कमळ हाती घेतलंय.  दरम्यान भाजपमध्ये अनुराधा पौडवाल यांना मोठी जबाबदारी मिळणार असल्याचं म्हटलं जात आहे. तसेच त्या भाजपसाठी स्टार प्रचारक असतील असं देखील सांगण्यात येत आहे.  त्याचप्रमाणे त्यांच्या या प्रवेशानंतर पक्षात त्यांना कोणती मोठी जबाबदारी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. दरम्यान लोकसभा लढवणार का? या प्रश्नाचं उत्तर देताना अनुराधा पौडवाल यांनी म्हटलं, की आता पक्ष मला जी जबाबदारी देईल, ती मी आनंदाने स्विकारेन.

COMMENTS