Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विचारधारा आणि पक्ष एकच ः आमदार लंके

पक्ष कधीच सोडला नसल्याचा केला दावा

पुणे ः गेल्या अनेक दिवसांपासून पारनेरचे आमदार नीलेश लंके खासदार शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँगे्रस पार्टी शरदचंद्र पवार यांच्या पक्षात प्रवेश कर

येवल्यात नवाब मलिक यांच्या अटकेच्या निषेधार्थ रस्ता रोको | LOKNews24
मराठी भाषेचे संवर्धन करायला हवे – डॉ शिवाजी काळे
आपल्या चॅनेलच्या माध्यमातून जाणून घेऊयात आजचे आपले राशीचक्र.

पुणे ः गेल्या अनेक दिवसांपासून पारनेरचे आमदार नीलेश लंके खासदार शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँगे्रस पार्टी शरदचंद्र पवार यांच्या पक्षात प्रवेश करून अहमदनगर दक्षिणेतून लोकसभा निवडणूक लढणार असल्याचे संकेत होते. अखेर गुरूवारी आमदार लंके यांनी पुण्यात शरद पवारांची भेट घेत, त्यांनी कोविड काळात केलेल्या कामांवर काढलेल्या पुस्तकांचे प्रकाशन देखील केले. मात्र त्यापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आपली विचारधारा आणि पक्ष एकच असल्याची ग्वाही आमदार लंके यांनी दिली.
यावेळी माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या थेट प्रश्‍नांना उत्तर देणे आमदार लंके यांनी टाळले. अहमदनगर दक्षिणेतून खासदारकी तुतारी की घडयाळ या चिन्हावर लढणार असा सवाल केल्यानंतर पवार साहेब आदेश देतील, त्यानुसारच लढूू असे उत्तर लंके यांनी दिले. तसेच आपण पक्ष कधीच सोडला नसल्याचा दावा देखील लंके यांनी केला. त्यामुळे लंके यांनी अधिकृत प्रवेश केला याबदद्ल संभ्रम आहे. यावेळी बोलतांना लंके म्हणाले की, माझी विचारधाराी अन् पक्ष एकच आहे. मी केव्हाच पक्ष सोडला नाही. शरद पवार साहेब आमच्या हृदयात आहेत. खासदारकी किंवा निवडणुकीविषयी माझी त्यांच्याशी कोणतीही चर्चा झाली नाही. मी आज येथे केवळ पुस्तक प्रकाशनासाठी आलो आहे. त्यामुळे एखाद्या गोष्टीची चर्चाच झाली नाही तर त्यावर बोलणे योग्य ठरणार नाही, असे मत लंके यांनी व्यक्त केले. आमदार लंके राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली होती. पण प्रत्यक्षात असा कोणताही प्रवेश झाला नाही. नीलेश लंके यांच्या ’मी अनुभवलेला कोविड’ या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शरद पवारांसह प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे ,आमदार अशोक पवार, प्राजक्त तनपुरे, प्रवक्ते अंकुश काकडे ,शहराध्यक्ष प्रशांत जगताप उपस्थित होते. लंके म्हणाले, देशात ज्या महत्वाच्या घडामोडी घडल्या आहेत, त्यात महत्वाची भूमिका शरद पवार यांनी बजावलेली आहे. शरद पवार साहेब आमच्या हृदयात आहेत. मला विधानसभा निवडणूक आज देखील आठवत आहे. त्याचा शुभारंभ पवार यांनी केला. कोरोना काळात अनेक जण नाती विसरली, पण शरद पवार यांच्या नावाने कोविड सेंटर सुरू करून 31 हजार लोकांना मदत केली. कोविड काळात आलेले अनुभव सविस्तरपणे या पुस्तकात मांडले आहेत.

घड्याळ आहे की तुतारी? …साहेब सांगतील तो आदेश ः लंके – आमदार निलेश लंके यांनी शरद पवार गटात अधिकृत प्रवेश केलेला नाही. निवडणूक लढविण्याबाबत किंवा शरद पवार गटात प्रवेश करण्याबाबत कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आले नाही. मात्र तुमच्या हातात घड्याळ आहे की तुतारी? असा प्रश्‍न विचारला असता साहेब सांगितल तो आदेश, असे सूचक विधान निलेश लंके यांनी केले. त्यामुळे लंके यांनी आजजरी शरद पवार गटात अधिकृत प्रवेश केला नसला तरी, आगामी काही दिवसांत ते अधिकृत प्रवेश करण्याची शक्यता आहे.

COMMENTS