Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सावित्रीमाई स्मृतिदिनी आयटक, एआयएसएफ तर्फे अभिवादन

नाशिक प्रतिनिधी - सी. बी. एस येथील आयटक कामगार केंद्रात क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांना ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन नाशिक आणि आयटक कामगा

Buldhana : बनावट पोलिसांनी केली 40 हजार रुपयांची फसवणुक | LOKNews24
सिव्हील हॉस्पिटल आगप्रकरणी अखेर डॉ. पोखरणाला अटक
सरसकट पंचनामे करून शेतकर्‍यांना भरीव मदत द्या ः नागरे

नाशिक प्रतिनिधी – सी. बी. एस येथील आयटक कामगार केंद्रात क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांना ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन नाशिक आणि आयटक कामगार संघटनेतर्फे अभिवादन करण्यात आले.सौ लता शैलेंद्र साळी, कॉ.प्राजक्ता कापडणे यांनी सावित्रीबाई फुले प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. एक कृतिशील सत्यशोधक कार्यकर्त्या ज्यांनी महात्मा फुले यांच्या महापरनिर्वाणानंतर सत्यशोधक कार्याचा गाडा यशस्वीपणे ओढला, एक आदर्श व प्रथम स्त्री शिक्षिका यांना यावेळी अभिवादन करण्यात आले. सावित्रीमाई यांचे अनेक पत्र मोडी लिपीत असल्याने ही भाषा शिकण्यासाठी लवकरच कार्यशाळा घेण्यात येईल असाही निश्चय करण्यात आल्या.यावेळी प्रा. रामदास भोंग, सोज्वळ साळी, विराज देवांग, प्राजक्ता कापडणे, लक्षिता देवांग, राणी जगधने व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

COMMENTS