Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राधिका आणि अनंत अंबानीच्या लग्नाची शानदार तयारी सुरु

मुंबई : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. गेल्यावर्षी त्यांच्या साखरपूडा पार पडला आणि आता त्यांच्या लग्नापूर्वीच्या कार्

मॉलवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला जेरबंद
राज्यभरातून होणाऱ्या विरोधानंतर अब्दुल सत्तारांची माफी
बिहारमध्ये जातनिहाय जनगणनेचा अहवाल प्रसिद्ध

मुंबई : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. गेल्यावर्षी त्यांच्या साखरपूडा पार पडला आणि आता त्यांच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमाला लवकरच सुरुवात होणार आहे. या कार्यक्रमाची तयारी करण्याची किंवा प्रॅक्टिस करण्यासाठी शाहरुख खानने गुजरातमधील जामनगरला भेट दिली. गुरुवारी, 22 फेब्रुवारी रोजी मुंबईला जाण्यापूर्वी त्यांनी जामनगरमध्ये एक दिवस घालवला. सोशल मीडियावर समोर आलेल्या एका व्हिडीओमध्ये शाहरुख खान जामनगर विमानतळावर मुंबईला जाणाऱ्या विमानात बसण्यासाठी एन्ट्री करताना दिसत आहे. त्याने काळ्या रंगाचं जाकेट घातलं होतं. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि एन्कोर हेल्थकेअरचे सीईओ वीरेन मर्चंट यांची मुलगी राधिका मर्चंट विवाहबंधनात अडकणार आहेत. त्यांचा विवाहपूर्व उत्सव 1 मार्च 2024 पासून सुरू होणार आहे आणि या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरु आहे. मुंबई : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. गेल्यावर्षी त्यांच्या साखरपूडा पार पडला आणि आता त्यांच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमाला लवकरच सुरुवात होणार आहे. या कार्यक्रमाची तयारी करण्याची किंवा प्रॅक्टिस करण्यासाठी शाहरुख खानने गुजरातमधील जामनगरला भेट दिली. गुरुवारी, 22 फेब्रुवारी रोजी मुंबईला जाण्यापूर्वी त्यांनी जामनगरमध्ये एक दिवस घालवला. सोशल मीडियावर समोर आलेल्या एका व्हिडीओमध्ये शाहरुख खान जामनगर विमानतळावर मुंबईला जाणाऱ्या विमानात बसण्यासाठी एन्ट्री करताना दिसत आहे. त्याने काळ्या रंगाचं जाकेट घातलं होतं. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि एन्कोर हेल्थकेअरचे सीईओ वीरेन मर्चंट यांची मुलगी राधिका मर्चंट विवाहबंधनात अडकणार आहेत. त्यांचा विवाहपूर्व उत्सव 1 मार्च 2024 पासून सुरू होणार आहे आणि या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरु आहे.

COMMENTS