Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अटल सेतूवरून धावणार ‘शिवनेरी’ बस

मुंबई : शिवडी ते नाव्हाशेवा दरम्यान नव्या ‘अटल सेतू’वरून एसटीची शिवनेरी बस सुरू करण्यात येणार आहे. पुणे ते मंत्रालय आणि स्वारगेट ते दादर शिवनेरी

भाजपला बोध
लिव्ह इन रिलेशनशीप अयोग्य नाही म्हणाऱ्या न्यायाधीशाला संपवलं पाहिजे | LOKNews24
धनादेश अनादर प्रकरणी लेखापरीक्षकाला एक वर्षाची शिक्षा ; आरोपी मुंबईतील लेखापरीक्षक

मुंबई : शिवडी ते नाव्हाशेवा दरम्यान नव्या ‘अटल सेतू’वरून एसटीची शिवनेरी बस सुरू करण्यात येणार आहे. पुणे ते मंत्रालय आणि स्वारगेट ते दादर शिवनेरी बसमध्ये पूर्ण क्षमतेने प्रवासी बसतात. त्यामुळे या प्रवाशांचा वेळ वाचवण्यासाठी अटल सेतूवरून शिवनेरी बस मुंबई गाठणार आहे. एसटी महामंडळाने प्रायोगिक तत्त्वावर 20 फेब्रुवारीपासून पुणे ते मंत्रालय (सकाळी 6.30 वाजता) व स्वारगेट- दादर (सकाळी 7 वाजता) या दोन शिवनेरी बस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या बस पुणे येथून निघून थेट पनवेल व्हावाशेवा, शिवडी मार्गे मंत्रालय/दादर येथे पोहोचतील. परतीचा प्रवास सकाळी 11 व दुपारी 1 वाजता याचमार्गे अनुक्रमे मंत्रालय व दादर येथून निघतील. यामुळे गर्दीच्या वेळी प्रवासाचा सुमारे 1 तास वाचणार आहे.

COMMENTS