ठेकेदाराला आमदारांनी बसविले चिखलात, कचराही ओतला

Homeमहाराष्ट्रमुंबई - ठाणे

ठेकेदाराला आमदारांनी बसविले चिखलात, कचराही ओतला

मुंबईतील चांदिवली भागातील आमदार दिलीप लांडे यांचा एक व्हिडिओ ’सोशल मीडिया’वर सध्या तुफान व्हायरल होत आहे.

गेवराई बाजार समितीच्या सभापती पदी मुजीब पठाण तर उपसभापती पदी विकास सानप यांची निवड
पाटोदा सोसायटी निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलचा विजय
सोनिया गांधींच्या ईडी चौकशीमुळे काँग्रेस आक्रमक

मुंबई / प्रतिनिधी : मुंबईतील चांदिवली भागातील आमदार दिलीप लांडे यांचा एक व्हिडिओ ’सोशल मीडिया’वर सध्या तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ते एका व्यक्तीला नाल्याच्या चिखलात जबरदस्तीने बसवत असल्याचे दिसून येत आहे. इतकेच नाहीतर काही लोक या व्यक्तीवर कचराही टाकत असल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही व्यक्ती एक कंत्राटदार आहे. तिला सफाईचे काम देण्यात आले होते; परंतु त्याने आपले काम प्रामाणिकपणे केले नाही. त्यामुळे धडा शिकवण्यासाठी आमदाराने असे केल्याचे सांगण्यात येत आहे. 

    योग्य नालेसफाई न झाल्याने कमानी परिसरात पाणी साचत होते. नागरिक याबाबत तक्रार करत होते, असे लांडे म्हणाले. कंत्राटदाराला बोलावले; पण तो दोन तास झाले तरी आला नाही. त्यामुळे त्याला शिवसैनिकांनी शोधून नाल्याजवळ आणला आणि रस्त्यावरील कचर्‍यात व घाणेरड्या पाण्यात बसवले. त्याच्या अंगावर शिवसैनिकांनी कचरादेखील ओतला, अशी माहिती लांडे यांनी दिली आहे. या भागातील आमदार म्हणून परिसर स्वच्छ राहावा ही माझी जबाबदारी आहे. तसेच नालेसफाईचे काम घेतलेल्या कंत्राटदाराचीही जबाबदारी आहे. कंत्राटदार आपले काम करत नसल्याने त्याला धडा शिकवला असे लांडे म्हणाले. दरम्यान, भाजपने या प्रकरणी जोरदार टीका केली आहे. महापालिकेत शिवसेनेची सत्ता असताना शिवसेनेचे आमदार, नगरसेवक काय करत आहेत, असा सवाल भाजपने केला. लांडे यांनी महापौर आणि महापालिका आयुक्तांना अशी वागणूक देण्याची हिंमत दाखवावी, असे आव्हान भाजपचे महापालिकेतील पक्षनेते विनोद मिश्रा यांनी दिले आहे.

COMMENTS