Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संगमनेरमध्ये बनावट गॅस रेग्युलेटर जप्त

विक्रेत्याविरोधात गुन्हा दाखल

संगमनेर ः नामांकित कंपनीच्या नावाने बनावट गॅस रेग्युलेटरची विक्री करणार्‍या विक्रेत्यांकडून संगमनेर पोलिसांनी 90 बनावट गॅस रेग्युलेटर जप्त केले आ

शिर्डी रामनवमी उत्सवानिमित्त प्रथमच दोन अध्यक्षांची निवड
सोमवारच्या महाराष्ट्र बंद मध्ये राष्ट्रवादी शहरात लखीमपूर घटनेचा निषेध नोंदवणार
पत्रकार बोठेची रवानगी नाशिक कारागृहात

संगमनेर ः नामांकित कंपनीच्या नावाने बनावट गॅस रेग्युलेटरची विक्री करणार्‍या विक्रेत्यांकडून संगमनेर पोलिसांनी 90 बनावट गॅस रेग्युलेटर जप्त केले आहे. संबंधित विक्रेत्याविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहे.
शहरातील सय्यद बाबा चौकात असलेल्या भारत स्टील नावाच्या दुकानात स्वयंपाक घरात नेहमीच वापरल्या जाणार्‍या गॅस टाकीसाठीच्या बनावट गॅस रेग्युलेटरची विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांना समजली होती. संबंधित ठिकाणी शनिवारी रात्री बनावट ग्राहक पाठवून यासंबंधी खात्री करण्यात आली. बनावट ग्राहकाने रेग्युलेटर खरेदी केल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल पवार, पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या कार्यालयातील कर्मचारी राहुल डोके, राहुल सारबंदे यांच्यासह अन्य पोलीस कर्मचार्‍यांनी दुकानाची झाडाझडती घेतली असता त्यांना 90 बनावट रेग्युलेटर आढळून आले. भारत कंपनी असे नाव असलेल्या पिवळ्या रंगाचे 16, एचपी कंपनी असे नाव असलेल्या निळ्या रंगाच्या 14, सेफ गॅस नाव असलेल्या राखाडी रंगाच्या 60 रेग्युलेटरचा समावेश आहे. पोलीस कर्मचार्‍यांनी हे सर्व गॅस रेग्युलेटर जप्त केले असून रैय्यान शेरखाण पठाण या दुकान मालका विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक केली आहे. तो विक्री करत असलेले बनावट गॅस रेग्युलेटर त्याने कुठून आणले, यापूर्वी शहरात किती गॅस रेग्युलेटरची विक्री केली. या संदर्भात पोलीस तपास करत आहे.

कारवाई करण्यात आलेल्या संबंधित दुकान मालकाकडे गॅस रेग्युलेटर विक्रीचा कोणताही परवाना नाही. बनावट गॅस रेग्युलेटरच्या विक्रीतून तो स्वतःसाठी आर्थिक फायदा घेत असून शेकडो नागरिकांचे आयुष्य धोक्यात आणत आहे. अशा प्रकारच्या रेग्युलेटर वापरातून स्वयंपाक घरात गॅस सिलेंडर स्फोटासारखी मोठी गंभीर दुर्घटना घडू शकते. शिवाय आजूबाजूच्या नागरिकांचे जीवन देखील धोक्यात येऊ शकते त्यामुळे नागरिकांनी याबाबत सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.
सोमनाथ वाघचौरे, पोलीस उपाधीक्षक संगमनेर.

COMMENTS