Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

साकरवाडीमध्ये मोफत सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन

गोदावरी बायोरिफायनरीज लिमिटेडचा पुढाकार

कोपरगाव : गोदावरी बायोरिफायनरीज लि. साकरवाडी  व के.जे. सोमैया मेडिकल कॉलेज आणि रिसर्च सेंटर, सोमैया आयुर्विहार मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने जि

राहात्यात महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. आंबेडकरांना अभिवादन
युवासेना तालुकाप्रमुखपदी आव्हाड उपतालुका प्रमुखपदी गुंजाळ
माजी आमदार वैभव पिचड अधिकाऱ्यांवर संतापले.

कोपरगाव : गोदावरी बायोरिफायनरीज लि. साकरवाडी  व के.जे. सोमैया मेडिकल कॉलेज आणि रिसर्च सेंटर, सोमैया आयुर्विहार मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साकरवाडी येथे रविवारी (ता. 18) सर्वरोग निदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 4 या वेळेत हे शिबिर होईल. गोदावरी बायोरिफायनरीज लि. साकरवाडी चे डायरेक्टर श्री. सुहास गोडगे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन होईल. मधुमेह, रक्तदाब, कॅन्सर, क्षयरोग आदी आजारांबाबत निदान व उपचार केले जाणार आहेत. स्त्रीरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, जनरल सर्जन, कान-नाक-घसा तज्ज्ञ, नेत्ररोग चिकित्सा आदींबाबत निदान व उपचार केले जाणार आहेत. या शिबिरामध्ये मुंबई येथील तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात येणार आहे. शिबिराला उपस्थित राहणार्‍यांनी आधार कार्ड सोबत आणणे अनिवार्य आहे. या शिबिराचा जास्तीत जास्त गरजूंनी लाभ घ्यावा असे आवाहन गोदावरी बायोरिफायनरीज लि. साकरवाडीचे जनरल मॅनेजर प्रवीण विभूते तसेच के.जे. सोमैया मेडिकल कॉलेज आणि रिसर्च सेंटर, सोमैया आयुर्विहार मुंबई च्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. मिनू यांनी केले आहे.

COMMENTS