Homeताज्या बातम्यादेश

चंदीगड निवडणुकीत लोकशाहीची हत्या

सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक अधिकार्‍याला झापले

नवी दिल्ली ः देशभरात गाजलेल्या चंदीगड महापौर निवडणुकीवरून वादळ उठले असून, याप्रकरणी सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी घेण्यात आली. महापौर निवडण

धारणगावमध्ये ग्रामपंचायतीच्या वतीने महिलांचा सन्मान
बाळ हिरड्यास रास्त भाव मिळण्यासाठी प्रयत्न करणार
निळवंडे येथे केंद्रस्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धा उत्साहात

नवी दिल्ली ः देशभरात गाजलेल्या चंदीगड महापौर निवडणुकीवरून वादळ उठले असून, याप्रकरणी सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी घेण्यात आली. महापौर निवडणुकीत झालेल्या मतमोजणीत छेडछाड केल्याचा आरोप आप आणि काँगे्रसच्या उमेदवारांनी करत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. यावर सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक अधिकारी अनिल मसिह यांना चांगलेच खडेबोल सुनावत, ही लोकशाहीची कू्रर थट्टा आहे, ही लोकशाहीची हत्या असल्याचे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी म्हटले आहे.
यावेळी सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले की, या निवडणुकीतून स्पष्ट आहे की, निवडणूक अधिकार्‍याने मतपत्रिका विदू्रप केली आहे. ते अशा पद्धतीने निवडणुका घेतात का? ही लोकशाहीची थट्टा आहे. ही लोकशाहीची हत्या आहे. या अधिकार्‍यावर कारवाई झाली पाहिजे. महापौर निवडणुकीचे संपूर्ण रेकॉर्ड जप्त करून पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार जनरलकडे ठेवावे, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. बॅलेट पेपर आणि व्हिडिओग्राफी सुरक्षितपणे ठेवावी. यासोबतच चंदीगड कॉर्पोरेशनची आगामी बैठक पुढे ढकलण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. आमच्या सद्सद्विवेक बुद्धीला संतुष्ट करावे लागेल, अन्यथा नव्याने निवडणुका घ्याव्या लागतील, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. आता पुढील सुनावणी 12 फेब्रुवारीला होणार आहे. कुलदीप कुमार यांनी ही याचिका दाखल केली आहे. त्यात त्यांनी भाजपचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष मनोज सोनकर यांची हकालपट्टी करून पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी केली आहे. निवडणूक अधिकारी अनिल मसिह यांनी मतमोजणीत छेडछाड केल्याचा युक्तिवाद याचिकेत करण्यात आला होता. त्यांच्या वतीने काँग्रेस नेते आणि ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तिवाद केला. 28 जानेवारी रोजी महापौरपदाची निवडणूक झाली होती. सर्वोच्च न्यायालयात  जाण्यापूर्वी कुलदीप कुमारच्या वतीने पंजाब आणि हरियाणा हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. यावरील सुनावणीदरम्यान त्यांना कोणताही दिलासा मिळाला नाही. त्यात न्यायमूर्ती सुधीर सिंह आणि हर्ष बांगर यांच्या खंडपीठाने निवडणुकीला स्थगिती देण्याची आपची मागणी फेटाळून लावली होती, त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.  

या निवडणुकीत आघाडीची 8 मते ठरली अवैध – देशभरात गाजत असलेल्या चंदीगड महापौर निवडणुकीत एक खासदार आणि 35 नगरसेवकांसह 36 मते पडली. यामध्ये भाजपचे 14 नगरसेवक, एक भाजप खासदार किरण खेर, 1 अकाली दलाचा आणि उर्वरित 20 मते आप आणि काँग्रेस नगरसेवकांची होती. सर्वांनी मतदान केले. मतमोजणीनंतर निवडणूक अधिकार्‍यांनी भाजपला 16 मते मिळाल्याचे सांगितले. तर, आप-काँग्रेसच्या उमेदवाराला 12 मते मिळाली, तर त्यांची 8 मते अवैध ठरली आहेत.

COMMENTS