Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या घरी ईडीची धाड

मुंबई: ठाकरे गटाचे नेते आणि उद्धव ठाकरे यांची विश्वासू रवींद्र वायकर यांच्या जोगेश्वरी येथील घरी सक्तवसुली संचलनालयाने ईडी धाड टाकली आहे. ईडीच्या

पुण्यात आज आणि उद्या पाणीपुरवठा बंद
तुरुंग तुमच्या बापाचं आहे का? – संजय राऊत..| BJP | Maharashtra |(Video)
शनिश्‍वर देवस्थानच्या पंढरपूर मठात प्रतिमा भेट

मुंबई: ठाकरे गटाचे नेते आणि उद्धव ठाकरे यांची विश्वासू रवींद्र वायकर यांच्या जोगेश्वरी येथील घरी सक्तवसुली संचलनालयाने ईडी धाड टाकली आहे. ईडीच्या पथकाने मंगळवारी सकाळी वायकर यांच्या घरावर धाड टाकली. ईडीच्या या पथकात १० ते १२ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. प्राथमिक माहितीनुसार, सकाळी साधारण साडेआठच्या सुमारास ईडीचे पथक वायकर यांच्या घरी पोहोचले. त्यानंतर वायकर यांच्या घरी ईडीची झाडाझडती सुरु आहे. वायकरांशी संबंधित सात ठिकाण्यांवर ईडीची छापेमारी सुरु असून यामध्ये त्यांच्या भागिदारांच्या घरांचाही समावेश आहे. जोगेश्वरीतील भूखंड घोटाळाप्रकरणी ईडीकडून ही धाड टाकण्यात आल्याचे समजते. आता या धाडीत ईडीच्या हाती काही पुरावे लागतात का आणि त्या अनुषंगाने ईडी रवींद्र वायकर यांच्यावर अटकेची कारवाई करणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

आज ईडीच्या पथकाने वायकर यांच्या घरावर धाड टाकून निर्णायक कारवाईच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकले आहे. त्यामुळे आता पुढे काय घडणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरले. शिवसेना आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांसमोर असलेल्या सुनावणीचा निकाल बुधवारी जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर ईडीची रवींद्र वायकर यांच्याविरोधातील कारवाई सूचक आणि महत्त्वाची मानली जात आहे

COMMENTS