कुबेरा घरचं दारिद्रय !

Homeताज्या बातम्यासंपादकीय

कुबेरा घरचं दारिद्रय !

तीन दिवसांत दोन वेळा एकाच ठिकाणच्या दोन घटनाप्रसंगावर लिहीण्याची वेळ येईल, असे आम्हाला वाटले नव्हते! वस्तुस्थितीत मात्र अनपेक्षितपणे असे प्रसंग ओढवता

केंद्रीय मंत्री कोशल किशोरच्या घरी तरूणाची हत्या
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा 23 धावांनी विजय
दोन तासांचा ब्लॉक 40 मिनिटातच आटोपला

तीन दिवसांत दोन वेळा एकाच ठिकाणच्या दोन घटनाप्रसंगावर लिहीण्याची वेळ येईल, असे आम्हाला वाटले नव्हते! वस्तुस्थितीत मात्र अनपेक्षितपणे असे प्रसंग ओढवतात. नाशिक च्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात परवा चित्रपट क्षेत्रातील दिग्गज जावेद अख्तर यांच्या भाषणावर जे ओरखडे ओढायचे ते आम्ही ओढलेच! परंतु, आज गिरीश कुबेर यांच्यावर लिहीण्याची पाळी येईल, असे वाटत नसताना लिहावे लागते आहे. गिरीश कुबेर यांचे लेखन वादग्रस्त ठरते, हे आता सुर्यप्रकाशा इतके स्पष्ट आहे. त्याची मुख्य दोन कारणे आहेत पहिले त्यांची आर‌एस‌एस धार्जिणी विश्लेषण पध्दती आणि दुसरी ब्राह्मणी इतिहासाला इतिहासतज्ज्ञ नसताना मान्यता मिळवून देण्याच्या खटाटोपातून होणारी मांडणी.  तत्पूर्वी त्यांचे नाशिक येथील साहित्य संमेलनात झालेल्या भाषणावर मांडणी करावयाची असली तरी आधी त्यांच्यावर झालेला कथित हल्ल्यासंदर्भात बोलूया. संभाजी ब्रिगेड च्या दोन कार्यकर्त्यांनी शाईफेकचा हल्ला कुबेर यांच्यावर केला म्हणे. त्यांच्या द रेनेसाॅन्स या इतिहासी मांडणी करणाऱ्या पुस्तकावरून हा हल्ला झाल्याचा सांगितले जात आहे. गिरीश कुबेर यांच्या त्या पुस्तकावर महाराष्ट्रात सर्वात मोठी झोड उठवली ती मराठा समाजाचे इतिहास तज्ज्ञ तथा नवविचारवंत डॉ. श्रीमंत कोकाटे यांनी. जेम्स लेन च्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी केलेल्या विकृत इतिहासाची तळी कुबेर यांनी आपल्या तथाकथित इतिहास मांडणीतून उचलली आहे. त्यांच्या द रेनेसाॅन्स च्या पुस्तकावर जे वैचारिक आणि ऐतिहासिक आक्षेप नोंदवले गेले त्यास कुबेर यांनी उत्तरे दिलेली नाहीत. त्यामुळे संभाजी ब्रिगेड च्या कार्यकर्त्यांमध्ये काहीसा रोष असू शकतो. तरीही संभाजी ब्रिगेड च्या कार्यकर्त्यांची कार्यपध्दती पाहता ते शाईहल्ल्यासारखे सौम्य लढ्याचा वापर करित नाहीत. त्यामुळे या शाईहल्ल्याची चौकशी करून सत्य बाहेर आले पाहिजे, अशी आम्ही मागणी करतो. कारण यापूर्वी शाईहल्ल्यासारखा प्रकार महाराष्ट्रात भुंकण्यासदृश्य ऍंकरिंग परंपरा आणणाऱ्या पत्रकारावरचा शाईहल्ला हा एक बनाव होता, हे महाराष्ट्रासमोर स्पष्ट झाले आहे. या हल्ल्याचा महाविकास आघाडी च्या किंग मेकर पैकी एक असणारे खासदार संजय राऊत यांनी तात्काळ निषेध नोंदवला. निषेध नोंदवताना त्यांनी सावरकर आणि कुसुमाग्रज यांच्या ऐतिहासिक भूमीत झालेला भ्याड हल्ला खपवून घेतला जाणार नसल्याची स्वागतार्ह भूमिका घेतली. परंतु, त्यांना आमचा प्रश्न एवढाच आहे की, जेम्स लेन यांच्या छत्रपती शिवराय संदर्भात मांडणी केलेल्या विकृत इतिहासाची री कुबेर यांनी द रेनेसाॅं मधून‌ ओढली त्याचाही खासदार संजय राऊत यांनी एकदा निषेध नोंदवावा. कुबेर यांची या संमेलनात जी कथनी राहीली ती देखील करनी पासून वेगळीच राहीली! अर्थात या परंपरेला संघिय परंपरा मानायचे की, ब्राह्मणी परंपरा याचा आम्हाला संभ्रम पडला आहे. कुबेर यांनी साहित्य संमेलनात बोलताना म्हटले की, पत्रकाराने समाज एका दिशेने जात असेल आपण त्याला दुसऱ्या दिशेने न्यायला हवे. त्यांची ही भूमिका अतिशय स्वागतार्ह आहे. पत्रकाराने समाज आणि सत्ता यांच्यावर प्रभाव ठेवून मार्गदर्शन करायला हवे. यात आम्हाला काहीही चूक वाटत नाही. परंतु, वस्तुस्थिती अशी आहे की, कुबेर यांचा पत्रकारितेतला प्रवास दीर्घकालीन आहे. उत्तरोत्तर त्यांना मिळालेली दैनिके ही चढत्या श्रेणीची राहीली. परंतु, त्यांनी लोकसत्ता सांभाळल्यापासून अनेक संपादकीयांवर वादळी चर्चा झाल्या. परंतु त्यांच्या लेखनाची धाटणी ही वैचारिक भासणारी असली तरी ती वास्तवात तशी नाही!  संघाची रणनिती नुसार  सरकारने काय भूमिका घ्याव्यात किंवा घेतल्या त्यास जनसमर्थन मिळवून देण्याचा ते आपल्या लेखनीतून प्रयोग करतात. त्यांच्या अनेक संपादकीय लेखांची छाननी केली तर ते संघधार्जिण्या पक्षांची आर्थिक, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक भूमिका मांडताना दिसतात, जेणेकरून संघविचारांच्या सत्ताधारी पक्षांनी प्रत्यक्षात ती व्यवस्था लागू केल्यावर त्याच्या विरोधाची तीव्रता कमी होईल. अर्थनितीत सपशेल पराभूत झालेल्या अर्थव्यवस्थेची तळीही त्यांनी मोदींच्या अनेक निर्णयासंदर्भात घेतली.त्यांच्या पत्रकारितेतील अलिकडील मांडणीतून हे स्पष्ट होते की, ते संघविचारांच्या दिशेने समाजाला नेऊ पाहतात. आज सत्ताधारी, समाज आणि पत्रकार हे सगळ्या एकाच दिशेने जात असल्याचा आक्षेप त्यांनी नोंदवला, हे आम्हाला अभिमानास्पद वाटते, एक पत्रकार म्हणून. परंतु, आमची छोटीशी अपेक्षा एवढीच आहे की, कुबेर यांनी संघशक्ती सत्तेच्या जोरावर अधिक आक्रमक झाल्या असताना आणि समाज सत्तेमुळे तिकडे झुकत असताना लोकशाही व्यवस्थेला निर्माण झालेला धोका याची विद्वान चर्चा करित असताना कुबेर यांनी वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न केला का? एवढाच आमचा प्रश्न आहे. अन्यथा, कुबेरा घरचं वैचारिक दारिद्रय अशी गत होऊ नये, असे आम्हाला वाटते.

COMMENTS