Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाविकास आघाडीचे जागावाटप अंतिम टप्प्यात

राजधानीत 29 डिसेंबरला महत्त्वाची बैठक

मुंबई ः आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर सर्वच पक्षांनी आपली रणनीती आखण्यास सुरूवात केली असली तरी, महाविकास आघाडीचा जागा-वाटपांचा घोळ का

महेश गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल
jalgaon:भुसावळ तालूक्यातील फुलगांव येथे पाणी प्रश्न पेटला | LOKNews24
बारावीचा निकाल उद्या लागणार

मुंबई ः आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर सर्वच पक्षांनी आपली रणनीती आखण्यास सुरूवात केली असली तरी, महाविकास आघाडीचा जागा-वाटपांचा घोळ काही मिटलेला नाही. सर्वच पक्षांचे नेते आम्ही इतक्या जागांवर लढण्याचा दावा करत आहे. मात्र आघाडीच्या जागावाटप आता अंतिम टप्प्यात आले आहे.
जागावाटपासंदर्भात ज्येष्ठ नेत्यांची सध्या दिल्लीत खलबते सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यात देखील महत्त्वाची चर्चा झाली आहे. ताकदीच्या नेत्यांना लोकसभा निवडणुकीची उमेदवारी देण्याबाबत महाविकास आघाडीत एकमत झाले आहे. ताकद कमी असलेल्या ठिकाणी मित्रपक्षांच्या नेत्यांना उमेदवारी देण्याबाबत चाचपणी करण्यात आली आहे. जागावाटपासंदर्भात येत्या 29 डिसेंबर रोजी महत्त्वाची बैठक दिल्लीत बोलावण्यात आली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही माहिती दिली आहे. मेरिटच्या आधारावर जागावाटप ठरेल अशी माहिती देखील नाना पटोले यांनी दिली आहे. मधल्या काळात जो आढावा घेतला आहे, तो सगळा रिपोर्ट सादर केला जाईल, असेही पटोले यांनी म्हटले. शिवसेना ठाकरे गट लोकसभेच्या 23 जागा लढेल, असा आकडा खासदार संजय राऊत यांनी जाहीर केला आहे. तर काँग्रेसला किमान 24 जागा लढायची इच्छा आहे, अशी चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार यांच्या नेतृत्वातील गटाने यासंदर्भात कोणताही आकडा अद्याप नमूद केलेला नाही, जिंकेल त्या पक्षाला उमेदवारी, असे या पक्षाचे मत असल्याचे बोलले जाते आहे.

COMMENTS