Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खा. शरद पवारांनी पुन्हा केले गौतम अदानींचे कौतुक

मुंबई : पुणे जिल्ह्यातील बारामती येथे नवीन तंत्रज्ञान केंद्राच्या उभारणीसाठी आर्थिक मदत केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी

पाटण तालुक्यातील नरबळी प्रकरणाचे कर्नाटक कनेक्शन घट्ट
सिव्हिलमध्ये आग प्रतिबंधक उपाययोजनांचे प्रात्यक्षिक
राष्ट्रपती पदासाठी मुर्मू यांचा विजय निश्चित !

मुंबई : पुणे जिल्ह्यातील बारामती येथे नवीन तंत्रज्ञान केंद्राच्या उभारणीसाठी आर्थिक मदत केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी उद्योगपती गौतम अदानी यांचे तोंड भरून कौतुक केले. यामुळे महाविकास आघाडीतील नेत्यांच्या भुवया पुन्हा उंचावल्या आहे. आखी दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे गटाने अदानींविरोधात मोर्चा काढला होता. मात्र, शरद पवार यांनी अडानी यांचे पुन्हा एकदा कौतुक केले आहे.
कार्यक्रमादरम्यान उपस्थितांना संबोधित करताना शरद पवार म्हणाले की, विद्या प्रतिष्ठान संस्थेने नवीन प्रकल्प हाती घेतला आहे. तंत्रज्ञानामुळे अभियांत्रिकी क्षेत्र झपाट्याने बदलत आहे. पुढे जाण्यासाठी हे बदल स्वीकारण्यास तयार राहण्यासाठी तरुणांना प्रशिक्षित करणे गरजेचे आहे. आम्ही भारतात आर्टिफिशियल इंटेलिजेन्सचे पहिले केंद्र तयार करत आहोत. त्याच्या उभारणीचे काम सुरू आहे. त्यासाठी अदानी यांनी 25 कोटी रुपयांचा धनादेश दिला. तर फर्स्ट सिफोटेक कंपनीने या प्रकल्पासाठी 10 कोटी रुपये दिले. त्यासाठी त्यांचे खूप खूप आभार. या दोघांच्या मदतीमुळे आज आपण या ठिकाणी दोन्ही प्रकल्प उभारत आहोत. त्यासाठीचं काम सुरू झाले आहे. 17 ते 22 जानेवारी या कालावधीत कृषी विकास प्रतिष्ठानच्या सहकार्यानं बारामतीत एका कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत आहे. त्यात लाखो शेतकरी सहभागी होतील, असे देखील पवार म्हणाले.

COMMENTS