Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

इस्लामपूर विधानसभा मतदार संघातील 22 गावातील 141 घरकुल मंजूर; निशिकांत भोसले-पाटील यांच्या पाठपुरव्याला यश

आ. जयंत पाटील पत्रप्रपंच हास्यास्पद…वाळवा तालुका भाजपाचे अध्यक्ष निवास पाटील म्हणाले, इस्लामपूर विधानसभा मतदार संघातील घरकुल मंजुर झालेल्या लाभार्थी

शेतकर्‍यांनो राज्य नको राज्यकर्ते बदला : रघुनाथदादा पाटील याचे आवाहन
कराड जनता बँकेतच्या ठेवीदारांची दिवाळी गोड: 35 हजार ठेवीदारांना 302 कोटीचे वाटप
सेल्फी पॉईंटचे आय लव्ह उरुण-इस्लामपूर करा; अन्यथा सेल्फी पॉईंट काढू : अखिल भारतीय मराठा सेवा संघ

आ. जयंत पाटील पत्रप्रपंच हास्यास्पद…
वाळवा तालुका भाजपाचे अध्यक्ष निवास पाटील म्हणाले, इस्लामपूर विधानसभा मतदार संघातील घरकुल मंजुर झालेल्या लाभार्थी यांना आ. जयंत पाटील यांनी मी पाठपुरावा केल्याने आपले घरकुल मंजुर झाले. आता आपण पुढील पाठपुरावा तुम्ही करा, असा लाभार्थी यांना पत्रप्रपंच करुन श्रेय लाटण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. अनेक लाभार्थ्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली. गेली कित्येक दिवस प्रस्ताव धुळ खात पडले होते. त्यावेळी तुम्ही सत्तेत होता त्यावेळी तुम्हाला मंजुर करता आली नाहीत आणि सत्तेत नसताना तुम्ही कसे मंजूर करता हा पत्रप्रपंच म्हणजे हास्यास्पद आहे, अशी गोष्ट आ. जयंत पाटील यांना शोभत नाही.

इस्लामपूर / प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री तथा सांगली जिल्हा पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या विशेष पाठपुरव्यामुळे महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील घटकांसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत इस्लामपूर विधानसभा मतदार संघातील 22 गावातील 141 वैयक्तिक घरकुल मंजूर झाली असल्याची माहीती भाजपाचे इस्लामपूर निवडणुक प्रमुख व सांगली जिल्हा भाजपा जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांनी दिली.
महाविकास आघाडीच्या सत्ता काळात या प्रस्तावांचा पाठपुरावा करुन ही घरकुलाचे प्रस्तावांना दुर्दैवाने मंजुरी दिली गेली नाही. या घरकुल प्रस्ताव मंजुर व्हावेत म्हणून आम्ही प्रयत्न केले. इस्लामपूर विधानसभेसह सांगली जिल्ह्यातील 1061 घरकुल प्रस्तांवाना नुकतीच मंजुरी मिळाली आहे.
या योजनेमार्फत प्रत्येक लाभार्थीला घरकुल बांधकाम साठी एक लाख वीस हजार रुपयांची मदत मिळणार आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात या घरकुल मंजुरी बाबत ठेंगा दाखविण्यात आला होता. महाविकास आघाडीच्या काळात या लाभार्थ्यांना मदतीचा निर्णय प्रलंबित ठेवला होता.
सांगली जिल्हा पालक मंत्री सुरेश खाडे यांच्याकडे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांनी पाठपुरावा करून प्रलंबित असणारी घरकुले मंजूर करून घेतली असून या घरकुल लाभार्थी यांना मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
गावनिहाय मंजूर घरकुल पुढील प्रमाणे
कारंदवाडी 3, किल्लेमच्छिंद्रगड 6, खरातवाडी 1, दुधारी 9, गोटखिंडी 1, नागाव 10, जूनेखेड 1, बोरगाव 3, बहे 12, बावची 2, बेरडमाची 14, येडेमच्छिंद्र 3, शिगाव 31, शिरगाव 12, हुबालवाडी 10, जांभूळवाडी 1, बिचुद 4, साखराळे 5, पडवळवाडी 1, भवानीनगर 5, मसुचीवाडी 1, तुंग 6.

COMMENTS