Homeताज्या बातम्याक्रीडा

बीसीसीआयकडून मोहम्मद शमी याची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस

नुकत्याच काही दिवसांपूर्वी आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेची सांगता झाली. वर्ल्ड कप अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा पराभव करत सहाव्यांद

शामगाव येथे लोकसहभागातून महिला कुस्ती संकुल
व्यंकटेश अय्यरचे हजारे ट्रॉफीत 4 सामन्यात 139 पेक्षा जास्त स्ट्राइक रेट
जखमी सूर्यकुमारची हटके पोस्ट; चाहत्यांनी दिल्या भन्नाट प्रतिक्रिया

नुकत्याच काही दिवसांपूर्वी आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेची सांगता झाली. वर्ल्ड कप अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा पराभव करत सहाव्यांदा वर्ल्ड कप जिंकला. टीम इंडियाने सलग 10 सामने जिंकून फायनलमध्ये धडक मारली. मात्र एका पराभवाने टीम इंडियाला वर्ल्ड कप गमवावा लागला. मात्र टीम इंडियाने त्याआधीच्या 10 सामन्यांमध्ये सर्व संघांवर एकतर्फी विजय मिळवला. टीम इंडियाच्या विजयात गोलंदाजांनी निर्णायक भूमिका राहिली. त्यातही मोहम्मद शमी याने टीम इंडियासाठी उल्लेखनीय कामगिरी केली. शमीच्या या कामगिरीसाठी बीसीसीआयने त्याच्या नावाची मानाच्या अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस केली आहे. अर्जुन पुरस्कार हा क्रीडा क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पुरस्कार आहे. मोहम्मद शमीचं नाव अर्जुन पुरस्काराच्या शर्यतीत अव्वल स्थानी आहे. एएनआयच्या माहितीनुसार, शमीला अर्जुन पुरस्कार देण्यात यावं यासाठी बीसीसीआयने क्रीडा मंत्रालयाकडे शिफारस केली आहे. त्याआधी या यादीत मोहम्मद शमीच्या नावाचा समावेश नव्हता. मात्र बीसीसीआयच्या विनंतीनंतर अर्जुनच्या नावाचा त्या यादीत समावेश करण्यात आलेला आहे. मात्र याबाबत अधिकृत घोषणा कुठेही करण्यात आलेली नाही.

COMMENTS