Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

छत्रपती शिवाजी‎ महाराजांच्या स्मारका समोरच केली आत्महत्या

मराठा आरक्षणाचा आणखी एक बळी

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी - राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला असतानाच दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आ

महिलेची तीन लहान मुलासह आत्महत्या
अभियंत्याची रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या
मराठा आरक्षणासाठी तरूणाची आत्महत्या

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी – राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला असतानाच दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी फुलंब्री तालुक्यातील एका तरुणाने आत्महत्या केली आहे. बुधवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे. विजय ‎पुंडलिक राकडे (वय ३९ वर्ष, खामगाव, फुलंब्री) असे आत्महत्या करणाऱ्या ‎तरुणाचे नाव आहे.‎ विशेष बाब म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासमोरच या तरुणाने विष प्राशन केलं. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मराठा आरक्षण मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनात विजय सहभागी झाला होता. मराठ्यांना आरक्षण मिळावं, अशी विजयची इच्छा होती. मात्र, यावर निर्णय होत नसल्याने विजय तणावाखाली गेला. या तणावातूनच त्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासमोर विष प्राशन केलं. दरम्यान, गावकऱ्यांना हा प्रकार कळताच त्यांनी विजयला तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. मात्र, उपचाराआधीच त्याचा मृत्यू झाला होता. मराठा‎ आरक्षणासाठी आपण आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी देखील विजयच्या खिशात आढळून आली. मराठा आरक्षणासाठी आणखी एका तरुणाने जीव दिल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

COMMENTS