Homeताज्या बातम्यादेश

जेष्ठ अभिनेत्री लीलावती यांचं निधन

बेंगलोर प्रतिनिधी - : तामिळ आणि तेलुगूसह 600 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलेल्या प्रख्यात कन्नड अभिनेत्री लीलावती यांचं शुक्रवारी संध्याकाळी बें

राहुरी बस स्थानकाच्या इमारतीचा प्रश्‍न तात्काळ सोडवा
त्या अपात्र संचालकांनी रिझर्व्ह बँकेला डिवचले…
श्री. साईबाबा संस्थानच्या नूतन अध्यक्ष व विश्वस्त मंडळास कारभार पाहण्यास सर्वोच्च न्यायालयाची परवानगी

बेंगलोर प्रतिनिधी – : तामिळ आणि तेलुगूसह 600 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलेल्या प्रख्यात कन्नड अभिनेत्री लीलावती यांचं शुक्रवारी संध्याकाळी बेंगळुरू शहराच्या बाहेरील नेलमंगला येथील एका खाजगी रुग्णालयात निधन झाले. त्या ८५ वर्षांच्या होत्या. गेल्या अनेक दिवसांपासुन लीलावथी या वृद्धापकाळाशी संबंधित आजारांनी त्रस्त होत्या. त्यांना एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. तब्बल 600 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलेल्या लीलावती गेल्या अनेक वर्षांपासून तिचा मुलगा विनोद राजसोबत नेलमंगला येथे राहत होत्या. विनोद सुद्धा एक अभिनेता आहे. दक्षिण कन्नड जिल्ह्यातील बेलथंगडी येथे लीला किरण म्हणून जन्मलेल्या लीलावती यांना ‘भक्त कुंभरा’, ‘संथा थुकाराम’, ‘भक्त प्रल्हादा’, ‘मांगल्य योग’ आणि ‘मन मेच्छिदा मदादी’ मधील भूमिकांसाठी ओळखले जाते. त्यांनी कन्नड मॅटिनी आयडॉल म्हणुन ओळख असलेल्या डॉ. राजकुमार यांच्यासोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

COMMENTS