Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हिंदूंच्या सुरक्षेसाठी समान नागरी कायदा हवा

कालीचरण महाराज यांची मागणी

अहमदनगर/प्रतिनिधी ः देशात हिंदूंच्या सुरक्षिततेसाठी समान नागरी कायदा हवा, सीएनआरसी कायदा लागू करावा, हिंदूराष्ट्रासाठी राजकारणाची हिंदूंची मतपेढी

श्रीरामपुरात हातभट्टी दारू अड्ड्यांवर पोलिसांचे छापे
जम्प रोप स्पर्धेसाठी अहमदनगर संघाची निवड चाचणीः संदीप कोयटे
सावळीविहीर मध्ये जावयाने केले तिहेरी हत्याकांड

अहमदनगर/प्रतिनिधी ः देशात हिंदूंच्या सुरक्षिततेसाठी समान नागरी कायदा हवा, सीएनआरसी कायदा लागू करावा, हिंदूराष्ट्रासाठी राजकारणाची हिंदूंची मतपेढी तयार करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन हिंदुत्ववादी कालीचरण महाराज यांनी केले. शहराजवळील बुरुडगाव येथे महाशिवरात्रीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या धर्मसभेनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी राहुल महाराज दरंदले, महंत शंकरनाथ महाराज, महंत ओमभारती महाराज आदी उपस्थित होते. धर्मसभेस आमदार संग्राम जगताप यांनीही हजेरी लावली.

अहमदनगरचे नाव प्राचीनकाळी अगस्त्यनगर होते. नंतर ते अंबिकानगर झाले, त्यानंतर मुस्लिम राजाने अहमदनगर हे नाव ठेवले. जेथे हिंदू अस्मिता आहेत त्या अस्मिता जपण्यासाठी नामांतर होण्याची आवश्यकता आहे,  अशी ही मागणी कालीचरण महाराज यांनी केली. कुठलीही धर्मनिरपेक्ष संकल्पना अस्तित्वात नाही, धर्मनिरपेक्षता म्हणजे अधर्म असाही दावा त्यांनी केला. महाराष्ट्रातील नाथांच्या समाध्यांचे मुस्लिमांकडून कब्जा केला जात आहे. त्याचे पीरमदारमध्ये रूपांतर करण्याचे षडयंत्र सुरू आहे. साईबाबांनाही मुस्लिम ठरवण्याचे षडयंत्र आखले जात आहे. ते आम्ही हाणून पाडू, साईबाबा हे हिंदू होते याचे पुरावे माझ्याकडे आहेत, असाही दावा त्यांनी केला. साईबाबांचे मुस्लिमकरण करून मंदिराची हजारो कोटींची संपत्ती बळकावण्याचे षडयंत्र आहे. अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या हिंदूंनी त्याला बळी पडू नये, असेही आवाहान त्यांनी केले. देशात पोलीस, लष्कर व काही मोजक्याच आमदार, खासदार, मुख्यमंत्री, पंतप्रधान यांच्यामुळे हिंदू सुरक्षित आहेत. त्यामुळे हिंदूंनी पोलिसांचा द्वेष करु नये, हिंदूंसाठी लव जिहाद, लँड जिहाद घातक ठरत आहेत. यासाठी राजकारणाचे हिंदूकरण हवे. हिंदू धर्माच्या सुरक्षेसाठी सडका वर्णवाद, जातीवाद, प्रांतवाद, भाषावाद यांचा त्याग केला पाहिजे, तरच हिंदूराष्ट्राचे स्वप्न पूर्ण होईल, असेही ते म्हणाले

COMMENTS