Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

१००% नुकसान भरपाई व कर्जमाफी मिळावी निफाड युवक काँग्रेसची मागणी

 निफाड- दिनांक २६ /११/२०२३ रोजी पुन्हा एकदा शेतकऱ्यांना अस्मानी संकटाचा सामना करावा लागला अचानक झालेल्या अवकाळी पावसाने तसेच प्रचंड प्रमाणात झा

एसटी कर्मचार्‍यांची टाळ-मृदुंगाच्या गजरात दिंडी
५G मोबाईल टॉवरमुळे कर्करोगाचा धोका… टॉवर लावण्यास नागरिकांचा विरोध…
जावलीतील शाळांमधे ’गुढीपाडवा; पट वाढवा’ अभियानास प्रारंभ; जिल्हा परिषदेचा उपक्रम

 निफाड- दिनांक २६ /११/२०२३ रोजी पुन्हा एकदा शेतकऱ्यांना अस्मानी संकटाचा सामना करावा लागला अचानक झालेल्या अवकाळी पावसाने तसेच प्रचंड प्रमाणात झालेल्या गारपिटीने शेतकऱ्यांवर मरणासन्न अवस्थेची वेळ आली.

       कोविड १९ ची परिस्थितीचे वर्ष तदनंतर अतिवृष्टीचे वर्ष त्यामुळे झालेली अपरिमित हानी पुन्हा दुष्काळ सदृश्य परिस्थितीचे हे वर्ष त्यात झालेली प्रचंड प्रमाणात गारपीट यामुळे शेतकरी वर्ग पूर्णपणे उध्वस्त झालेला आहे.असे ज्येष्ठ नेते विनायक शिंदे यांनी सांगितले.

      सततच्या अस्मानी संकटाची मालिका अस्मानी सोबत सुलतानीचे संकट, राजकीय संवेदनशीलतेचा शेतकऱ्यांच्या प्रतीचा अभाव, शासनाची आयात-निर्यात धोरणे, शेतकऱ्यांच्या रुपयाचे झालेले अवमूल्यन, सातत्याने होत चाललेली दरवाढ, भाववाढ, खते, बी-बियाण्याची अपूर्णता, फसवणुकी या व अनेक समस्यांची संघर्ष करीत आपले जीवनमान जगताना शेतकरी मेटाकुटीस आलेला आहे,

        सदरचे निवेदन सादर करीत असताना शेतकऱ्यांच्या श्रमा बरोबर त्यांच्या असह्य होणाऱ्या यातनांची संवेदना यांवर सादर करीत असून शासकीय-प्रशासकीय यंत्रणेस सदर निवेदनाद्वारे विनंती की तात्काळ शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी शासन स्तरावरून सरसकट कर्जमाफी,शैक्षणिक सवलती,शेतकऱ्यांना मिळावी तसेच शासन आदेशाने यावर्षी दुष्काळ सदृश्य परिस्थितीत जाहीर केलेले सर्व बाबींची पूर्तता व्हावी याचबरोबर यावर्षी वाटप केलेल्या अपूर्ण पीक अग्रिम पिक विम्याची चौकशी होऊन तात्काळ अपूर्ण असलेल्या रकमांचे रकमा अदा करण्याचे आदेश व्हावेत.अशा आशयाचे निवेदन तहसीलदार शरद घोरपडे साहेब,प्रांत कार्यालय व कृषी विभाग कार्यालय यांना युवक काँग्रेसचे अध्यक्ष सचिन खडताळे यांच्या वतीने देण्यात आले.

     याप्रसंगी स्वप्नील बिनायकिया,अलीभाई शेख, नंदकिशोर कापसे,शेरखान मुलाणी,बाळासाहेब खालकर,मनोज निर्भवणे,सचिन गवळी,दिनेश कापसे, तौसिफ राजे,वैभव निफाडकर,राहुल पवार,सागर खरे,तेजस मोरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

COMMENTS